बारामती - सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येत्या आठवड्यात कार्यान्वित

मिलिंद संगई
बुधवार, 27 जून 2018

बारामती शहर - शहराच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. कऱ्हा नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी या प्रकल्पात साठवून त्यावर प्रक्रीया करुन परत हे पाणी नदीमध्ये सोडले जाणार आहे. या मुळे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण दूर होऊन शेतक-यांनाही भविष्यात शेतीसाठी या पाण्याचा वापर करता येणार आहे. 

बारामती शहर - शहराच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. कऱ्हा नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी या प्रकल्पात साठवून त्यावर प्रक्रीया करुन परत हे पाणी नदीमध्ये सोडले जाणार आहे. या मुळे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण दूर होऊन शेतक-यांनाही भविष्यात शेतीसाठी या पाण्याचा वापर करता येणार आहे. 

बारामती नगरपालिकेने 2014 पासून हाती घेतलेला तब्बल 25 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प अखेर चार वर्षांच्या कालावधीनंतर पूर्णत्वास जात आहे. 
अत्याधुनिक प्रकल्प..बारामतीचा सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प अत्याधुनिक असून एस.बी.आर. (सिक्वेन्शल बॅच रिअँक्टर) तंत्रज्ञानावर आधारित व संपूर्ण स्वयंचलित आहे. प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा यांचाही या प्रकल्पात समावेश आहे. सांडपाण्यावरील प्रक्रीया व्यवस्थित व्हावी असा या मागील उद्देश आहे. 

प्रदूषण अजिबात होणार नाही. 
नदीमध्ये सोडण्यात येणा-या पाण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार जैविक ऑक्सिजन मागणी किमान दहा मिलिग्रॅम प्रति लिटर इतकी असावी लागते. बारामतीच्या सांडपाणी प्रक्रीया केंद्रातून बाहेर पडणारे पाणी पाच मिलिग्रॅम प्रति लिटर असल्याने प्रदूषणाचा धोका शून्यावर आला आहे. पुढील तीस वर्षात बारामतीची मूळ गावठाणातील लोकसंख्या किती असेल अशा गृहीतकावर या प्रकल्पाच्या क्षमतेचे निश्चितीकरण करण्यात आले आहे. 

शेतीसाठी वापरणार पाणी.
या प्रकल्पातून प्रक्रीया केल्यानंतर सात ते आठ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी बाहेर पडेल, कालांतराने हेच पाणी साडेअकरा दशलक्ष लिटरपर्यंत जाईल असा अंदाज आहे. हे पाणी भविष्यात शेतीसाठी देण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न असेल, या बाबत अद्याप धोरणनिश्चिती करण्यात आली नाही, मात्र हे पाणी नाममात्र दराने विक्री करुन त्या पासून नगरपालिका उत्पन्नही मिळवू शकेल. 

कसा चालेल प्रकल्प....
-वीस फूटी व्यासाच्या पाइपमधून सांडपाणी प्रकल्पात येईल
-25 फूट खोल संपवेलमध्ये हे पाणी घेतले जाईल.
-तेथून स्टिलिंग चेंबरमध्ये सहा मि.मी. पेक्षा लहान वस्तू बाहेर काढणा-या 
चाळणीद्वारे ग्रीट चेंबरमध्ये पाणी येईल.
-प्रक्रीया करणा-या दोन बेसिनमध्ये त्यावर जैविक प्रक्रीया होईल.
- त्यातून बाहेर पडणा-या पाण्यावर क्लोरिन डोसिंग होईल 
- क्लोरिन डोसिंग झालेले पाणी शेतीसाठी सोडले जाईल. 

Web Title: Baramati - The sewage treatment project is implemented in the coming weeks