बाजारपेठ महिलांच्या आवाक्यात (व्हिडिओ)

ज्ञानेश्वर रायते
रविवार, 6 मे 2018

बारामती (पुणे): ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाने महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री महिलांच्या माध्यमातून करत आज पुढचे पाऊल टाकले. पुण्याची बाजारपेठ महिला बचत गटांच्या आवाक्‍यात आणताना आज तब्बल अर्धा टन वाळवणाच्या पदार्थ विक्रीची व्यवस्था केली.

बारामती (पुणे): ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाने महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री महिलांच्या माध्यमातून करत आज पुढचे पाऊल टाकले. पुण्याची बाजारपेठ महिला बचत गटांच्या आवाक्‍यात आणताना आज तब्बल अर्धा टन वाळवणाच्या पदार्थ विक्रीची व्यवस्था केली.

ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत आज शारदानगर येथे संतकृपा महिला उद्योग या फिरत्या विक्री केंद्राकडे अर्धा टन वाळवणाचे पदार्थ सोपविण्यात आले. याची विक्री पुण्यासह शहरी व निमशहरी भागात केली जाणार आहे. मळद व इतर गावांतील महिलांनी पापड्या, ज्वारीच्या पापड्या, वेगवेगळ्या चवीच्या शेवया, सांडगे, कुरडई, नाचणीचे पापड, नारळाच्या शेवया आदी 500 किलो वाळवणाचे पदार्थ संतकृपा महिला गृह उद्योगाकडे सोपविले. काही दिवसांपूर्वीच संतकृपा उद्योगाच्या संचालकांनी सुनंदा पवार यांच्या सूचनेनुसार मळद येथील महिला बचत गटांशी संपर्क साधून त्यांना एक टन वाळवणाचे पदार्थ तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार आज पाचशे किलो पदार्थ महिलांनी संतकृपा उद्योगाकडे सोपवले.

यासंदर्भात सुनंदा पवार म्हणाल्या, ""भीमथडी जत्रेमुळे 1800 महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. शंभर महिलांनी त्यांचे व्यवसाय, उद्योग उभारले. महिला बचत गटांना भीमथडीच्या माध्यमातून अप्रत्यक्षही बाजारपेठ मिळाली. जत्रेतील त्यांचे पदार्थ पाहून त्यांना खासगी स्तरातूनही मागणी झाली. एकंदरीत महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ हवी होती. ती मिळते याचे समाधान आहे.''

महिला बचत गटाच्या गायकवाड म्हणाल्या, ""सुनंदा पवार यांच्यामुळे आम्ही हे काम करू शकलो. भीमथडी जत्रेने आम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिली. आता आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. आम्ही हे काम आणखी तत्परतेने करू.''

Web Title: baramati sharda mahila sangh bachat gat and market