बारामती एसटी आगार उत्पन्नाचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

बारामती शहर - रक्षाबंधनाच्या सणाचा येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगाराला जबरदस्त फायदा झाला असून, उत्पन्नाचे आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढले गेले. सोमवारी (ता. २७) बारामती आगाराने एकाच दिवसात ३८ हजार किलोमीटर प्रवास करून तब्बल २२ लाख ४६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले.

या एकाच दिवसात बारामती आगाराने ४४ हजार ५६५ प्रवाशांची वाहतूक करून हे उत्पन्न प्राप्त केले. हे उत्पन्न पुणे विभागात सर्वाधिक ठरले आहे. विशेष म्हणजे स्वारगेट, शिवाजीनगर या पुणे शहरातील आगारांना पाठीमागे टाकत हा नवीन विक्रम प्रस्थापित केले आहे. स्थापना झाल्यापासून एकाच दिवसात सर्वाधिक उत्पन्न प्राप्त करणारा दिवस अशी नोंद या सोमवारची झाली.

Web Title: Baramati ST Depot record income rakshabandhan festival