मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच बारामती दौरा, राजकीय रंग नको : खासदार बारणे

चिंतामणी क्षीरसागर
Monday, 19 October 2020

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या पोचवणे हा दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. शिवसेना नेत्यांच्या बारामती दौऱ्याला राजकीय रंग लावू नये मुख्यमंत्र्यांचे आदेशाने अधिक नुकसान झालेल्या भागाची पाहणी करीत आहोत, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

वडगाव निंबाळकर : शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या पोचवणे हा दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. शिवसेना नेत्यांच्या बारामती दौऱ्याला राजकीय रंग लावू नये मुख्यमंत्र्यांचे आदेशाने अधिक नुकसान झालेल्या भागाची पाहणी करीत आहोत, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बारणे बोलत होते. सोबत शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर, जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे, लोकसभा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने, वडगाव शाखाप्रमुख नितीन गायकवाड, गणेश पाटोळे, कल्याण जाधव, पप्पू माने, सुदाम गायकवाड, निखिल देवकाते, मंगेश खताळ, बंटी गायकवाड, सुभाष वाघ, खताळ बंटी, गायकवाड सुभाष, वाघ बंटी, गायकवाड सुभाष आदी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील रमाई माता नगर भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते, याबाबत शिवसेना नेत्यांनी रहिवाशांची चर्चा केली. गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. यापूर्वी आलेले पाणी आणि आत्ता काय उपाययोजना करता येतील याबाबत स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्याशी नेत्यांनी चर्चा चर्चा केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील रहिवाशांच्या मागणीनुसार काम करण्याचा प्रयत्न राहील. जिल्हाधिकारी यांना तसे आदेश देऊ ओढा खोलीकरण, रूंदीकरण, इत्यादी कामे हाती घेण्याचा प्रयत्न आहे. ओढ्यातील प्रवाही मार्गात मार्गात अतिक्रमण झाल्यामुळे पाणी विस्तारले आणि लोकांच्या घरात गेली अशा तक्रारी आले आहेत. यावर योग्य ते उपाय योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयाला अहवाल पाठवला जाईल असे सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati tour to know the plight of farmers says mp barne