बारामती, अपघातात दोन बैलांचा मृत्यु, तर चौघे गंभीर जखमी

पाहुणेवाडी (ता. बारामती) हद्दीतील राज्यमार्गावर आज पहाटे (सोमवार) एका माल वाहतूक ट्रकने माळेगाव कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या चार बैलगाड्यांना जोरदार धडक दिली.
sugarcane on bullock cart
sugarcane on bullock cartsakal
Summary

पाहुणेवाडी (ता. बारामती) हद्दीतील राज्यमार्गावर आज पहाटे (सोमवार) एका माल वाहतूक ट्रकने माळेगाव कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या चार बैलगाड्यांना जोरदार धडक दिली.

माळेगाव - पाहुणेवाडी (ता. बारामती) हद्दीतील राज्यमार्गावर आज पहाटे (सोमवार) एका माल वाहतूक ट्रकने (Truck) माळेगाव कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या चार बैलगाड्यांना (Bullockcart) जोरदार धडक (Dash) दिली. या दुर्घटनेत दोन बैलांचा (Bullock) मृत्यु (Death) झाला, तर ऊस तोडणी मजूरांमध्ये दोन महिलांसह (Women) दोन गाडीवान (पुरूष) गंभीर जखमी (Injured) झालेत. अशोक गबरू राठोड, अश्विनी अशोक राठोड, ज्ञानेश्वर अशोक राठोड, लुका गबरू राठोड, चंदनीबाई गबरू राठोड (सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव ) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. माळेगाव कारखाना प्रशासनाच्या वतीने संबंधित जखमींना बारामती शहरातील खासगी हाॅस्पीटलमध्ये पुढील वैद्यकिय उपचार दिले जात आहेत. जखमींपैकी अशोक राठोड (वय ३५) या रुग्णांचा एक पाय निकामी झाल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले. माळेगावचा ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना वरील मोठी दुर्घटना घडल्याने प्रशासनासह तोडणी मजूरांनी खूपच हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, माळेगावच्या ऊस वाहतूक करणाऱ्या सहा बैलगाड्या नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटेच्यावेळी नीरावागज गटात ऊस तोडीसाठी निघाल्या होत्या. पाहुणेवाडी हद्दीतील राज्यमार्गावरून जात असताना बारामती दिशेकडे निघालेल्या माल ट्रकने मागून येऊन बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात ऐढा भयानक होता, की अनेक गावकऱ्यांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली, शिवाय कारखान्याच्या कर्मचारीही जखमी मजूरांना वेळेत वैद्यकिय उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यानच्या कालावधीत माळेगाव पोलस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुधिर काळे आदींनी अपघातग्रस्त माल ट्रक व चालकाला ताब्यात घेतले. सुधाकर विश्वनाथ शिंदे (रा. पारगाव-वारणा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com