esakal | तरुणांनो, या ठिकाणी आहे नोकरीची सुवर्णंसंधी
sakal

बोलून बातमी शोधा

job

बारामती एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीमध्ये 200 कामगारांची भरती तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिली.

तरुणांनो, या ठिकाणी आहे नोकरीची सुवर्णंसंधी

sakal_logo
By
डाॅ. संदेश शहा

इंदापूर (पुणे) : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीमध्ये 200 कामगारांची भरती तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिली.

आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख

कोरोनाच्या संचारबंदीत परराज्यातील अनेक कामगार घरी गेल्याने अनेक कंपनीत कुशल व अकुशल मनुष्यबळ कमतरता जाणवत आहे. त्यामुळे कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी बेरोजगार युवक युवतींनी पुढे येणे गरजेचे आहे. आयटीआय मेकॅनिकल, मेकॅनिकल डिप्लोमा इन इंजिनिअरिंग व बीई मेकॅनिकल शैक्षणिक पात्रता असलेल्या बेरोजगार युवक युवतींना ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 

आणखी वाचा - वाचा चक्रीवादळ आणि पुण्यातल्या उपाययोजना 

या काळात आयटीआय झालेल्यांना 12 हजार, डिप्लोमाधारकास 12 हजार 500, तर डिग्रीधारकास 13 हजार 125 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. त्यांना सकाळी साडेआठ ते दुपारी 1 वाजेपर्यंत उपहारगृहसेवा उपलब्ध आहे. 

आणखी वाचा - पुण्यातून प्रवास करणार असला तर ही बातमी वाचा

या नोकरीसाठी आयटीआय गुणपत्रकाची झेरॉक्स, दहावी गुणपत्रिकेची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, 4 पासपोर्ट साइज फोटो घेऊन युवक युवतींनी बारामती एमआयडीसीतील बीएसएनएल कार्यालयामागील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल कार्यालयात दूरध्वनी क्रमांक 02112243760, खाडे सर (मो : 9890200085 / 9075623648) किंवा राखुंडे सर (मो : 7350014484) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गारटकर यांनी केले आहे.
 

loading image