बारामतीतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी बारामतीकरांकडून मदतीचा ओघ सलग तिसऱ्या दिवशीही कायम होता.

बारामती शहर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी बारामतीकरांकडून मदतीचा ओघ सलग तिसऱ्या दिवशीही कायम होता.

दरम्यान, परिसरात बाधित झालेल्या कुटुंबांना मदतीसाठी बारामतीतील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती उस्फूर्तपणे पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. 

आज सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त भागासाठी दिवंगत धनंजय भाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्ट व नगरसेवक जयसिंग बबलू देशमुख मित्र परिवाराच्या वतीने 300 लिटर फिनेल, 300 खराटे व 500 टी-शर्ट रवाना करण्यात आले.

दरम्यान, पविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही मदत रवाना करण्यात आली. या भागातील पूरग्रस्त जनतेला यापुढील काळातही आवश्यकतेनुसार मदत करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramatikars helping form flood victims in kolhapur and sangli