बारामतीचा सतीश अंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेणार 

मिलिंद संगई
शनिवार, 16 जून 2018

बारामती शहर - जगातील नामांकीत स्पर्धा समजल्या जाणा-या आयर्नमॅन या स्पर्धेसाठी बारामतीचा एक ध्येयवेडा गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. या स्पर्धेत तो मराठी या नात्याने सहभागी होत या स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी झगडणार आहे. सतीश रामचंद्र ननवरे असे या बारामतीकराचे नाव आहे. 

येत्या जुलै महिन्यात ऑस्ट्रिया या देशात ही स्पर्धा होणार आहे. जलतरण, धावणे व सायकलींग अशा तीन प्रकारात ही स्पर्धा होते. चार कि.मी. जलतरण, 180 कि.मी. सायकल चालविणे व 42 कि.मी. धावणे अशा तीन स्पर्धा लागोपाठ ठराविक वेळेत पूर्ण करुन त्यात यश मिळविण्याचे आव्हान सतीश ननवरे याने स्विकारले आहे. 

गेल्या वर्षपासून तो या तिन्ही प्रकारासाठी दररोज पाच तासांचा सराव तो करतो आहे. पुणे बारामती असे अंतर सायकलवरुन त्याने अनेकदा पूर्ण केलेले आहे. स्वताःचा पब्लिसीटीचा व्यवसाय सांभाळून त्याचा हा सराव सुरु आहे. पंचक्रोशीतून अशा स्पर्धेसाठी जाणारा तो पहिलाच ठरणार आहे. 

शारिरीक व मानसिक संतुलन राखत निराश न होता प्रचंड मेहनत लागते, अत्यंत खडतर स्पर्धा समजली जाते, शारिरीक क्षमतेचा कस यात लागतो,  कोणत्याही प्रकारची शारिरीक इजा होऊ न देता हा सराव पूर्ण करण्याचे काम त्याने केलेले आहे. 

राज्याच्या ग्रामीण भागातून ऑस्ट्रियाला जाणारा सतीश हा पहिलाच ठरणार आहे. सोळा तासात ही स्पर्धा पूर्ण केल्यास प्रमाणपत्र व किताब बहाल केला जातो. हे लक्ष्य दहा तासाच पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करुन सतीशचा सराव सुरु आहे. दहा तासात या तिन्ही स्पर्धा पूर्ण करुन आपले स्वप्न साकारण्याचा सतीशचा प्रयत्न आहे. कोल्हापूरचे अश्विन भोसले व बारामतीचे सुभाष बर्गे यांचे त्याला मार्गदर्शन मिळत आहे. 

Web Title: baramatis Satish will participate in the International Airman Championship