रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बारामतीकरांना कमालीचा मनस्ताप

मिलिंद संगई, बारामती
रविवार, 24 जून 2018

बारामती शहर : शहरातील तीन हत्ती चौकाजवळ पुनावाला बागेसमोरील रस्त्याची दुरुस्तीच नगरपालिकेकडून होत नसल्याने बारामतीकरांना कमालीचा मनस्ताप होत आहे. या ठिकाणी गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने रस्ता खचून खड्डे पडले आहेत. त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून आंदोलनही झाले, त्यात झाडे लावण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केला. मात्र जुजबी आश्वासने देऊन नगरपालिकेने आंदोलन संपविले.

प्रत्यक्षात आजही या रस्त्यामुळे लोकांची हाडे खिळखिळी होत आहेत. पावसाळ्यात तर या खड्डयात पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना अंदाज येत नसल्याने लोक त्यात आपटतात. 
या संदर्भात अनेकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. या बाबत नगरपालिका प्रशासनाने निविदा प्रसिध्द करण्या पलिकडे काहीच केले नाही. अनेकदा निविदा प्रसिध्द करुन या कामाची निविदा कोणीच भरत नसल्याचे नेहमीचेच कारण पुढे केले जाते. आता या कामाची वर्क ऑर्डर दिली जाणार असल्याचे नगरपालिकेकडून सांगितले गेले. 
प्रत्यक्षात मात्र केव्हा वर्क ऑर्डर दिली जाणार आणि केव्हा या रस्त्याचे काम पूर्ण होणार याचीच बारामतीकरांना प्रतिक्षा आहे. 

Web Title: barmatikars extremely distressed due bad condition road