Sakal Impact : सुतार दवाखान्यासमोर बसवले बॅरिकेड्स

समाधान काटे
Wednesday, 2 December 2020

अतिक्रमण विभाग ​याकडे डोळेझाक करत असून रात्री ७ ते ९:३० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते. ज्या तत्परतेने बॅरिकेड्स लावले त्याच तत्परतेने रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या अनाधिकृत भाजी विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात येत नाही.
 

पुणे : कोथरूड मधील आझाद नगरमध्ये असलेल्या सुतार दवाखान्यासमोर रस्त्यावर भाजी विक्रेते अतिक्रमण करून हातगाड्या लावून विक्री करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन ई-सकाळ (आॉनलाईन) बातमी २५ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती.

बातमीची दखल घेऊन प्रशासनाने रस्त्याच्या कडेला बॅरिकेड्स(अडथळे) लावले आहे . तरी देखील काही विक्रेते रस्त्यावर भाजी विक्री करण्यासाठी हातगाडी लावून अतिक्रमण करत आहेत.अतिक्रमण विभाग ​याकडे डोळेझाक करत असून रात्री ७ ते ९:३० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते. ज्या तत्परतेने बॅरिकेड्स लावले त्याच तत्परतेने रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या अनाधिकृत भाजी विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात येत नाही.

पुणेकरांनो, उद्याने खूली झाल्याने, कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात जायचा विचार करताय का?

अधिकृत भाजी विक्रेते बॅरिकेड्सच्या आतील बाजूस भाजी विक्री करतात.अनाधिकृत भाजी विक्रेते बॅरिकेड्सच्या बाहेर रस्त्यावर विक्री करतात. अनाधिकृत भाजी विक्रेत्यांमुळे अधिकृत भाजी विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.

पदवीधरच्या निवडणुकीदरम्यान पुण्यात घडले अनेक गंमतीदार किस्से ! 
 

"सध्या कर्मचारी उपलब्ध नाहीत. टेंडर संपले आहे. पुढील दोन चार दिवसात टेंडर निघाले की कर्मचारी येतील. यावर लवकरच कारवाई केली जाईल"
- नारायण साबळे क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barricades erected in front of the carpenter's hospital Sakal Impact