ऑनलाईन शिक्षणातील अडथळ्यांवर मात करत विद्यार्थी गिरवतायेत धडे  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wakeshvar

 ऑनलाईन तास सुरू झाल्यामुळे अनेक पालकांनी नवीन मोबाईल घेतले आहेत. पण, काही भागात रेंजचा अडथळा आहे. तसेच, काहींकडे मोबाईल नाहीत. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

ऑनलाईन शिक्षणातील अडथळ्यांवर मात करत विद्यार्थी गिरवतायेत धडे 

सातगाव पठार (पुणे) : कोरोना काळात कुठेही प्रत्यक्षात शाळा सुरू नाहीत. जरी प्रत्यक्षात शाळा जरी भरली नसली, तरी विद्यार्थ्यांविना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा सुरूच आहे. ऑनलाईन तास सुरू झाल्यामुळे अनेक पालकांनी नवीन मोबाईल घेतले आहेत. पण, काही भागात रेंजचा अडथळा आहे. तसेच, काहींकडे मोबाईल नाहीत. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. मात्र, आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील अशा विद्यार्थ्यांशी थेट संपर्क करून किंवा मोबाईलवरून अभ्यास दिला जात आहे.   

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार

केंद्रिय गृहमंत्रालयाकडून अनलॉक– 4चे नवे दिशा-निर्देश नुकतेच जारी करण्यात आले. यामध्ये सप्टेंबर महिन्यात शाळा सुरू केल्या जातील, अशी विद्यार्थ्यांना आशा होती. मात्र, 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या अनलॉक-4 मध्ये देखील शाळा सुरू होणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाची अजूनही काही काळ प्रतिक्षाच करावी लागणार आहे. 

पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने पोचववला पुस्तकांचा ठेवा विद्यार्थ्यांच्या घरात

शाळेचा पहिला दिवस पहिल्यांदाच शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवणीचा ठेवा असतो. जून महिना सुरू झाला की शालेय विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. मग पाटी, दप्तर, गणवेश, वह्या, पुस्तके खरेदीची लगबग सुरू होते. पण, यंदा मात्र कोरोना संकटात सगळं विश्व ढवळून निघाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाचा, नवीन खरेदीचा आनंद मात्र लुटता आला नाही. नव्या शैक्षणिक वर्षाची नवलाई विद्यार्थ्यांना यंदा अनुभवता आली नाही. मात्र, असे असले तरी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा सुरूच आहे. काही भागात रेंजचा अडथळा आहे. तसेच, काहींकडे मोबाईल नाहीत. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

करू का अजितदादांना फोन..

पेठ येथील श्री वाकेश्वर इंग्लिश मेडियम स्कूल, श्री वाकेश्वर विद्यालय व श्रीमान एन. डी. पवळे कनिष्ठ महाविद्यालय पेठ कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत एकूण 1200 विध्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. 50 टक्के पालक आपल्या मुलांना मोबाईल उपलब्ध करून देत आहते, तर 25 टक्के पालक शेतकरी असल्याने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शेतात मोबाईल नेतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी मुलांना मोबाईल उपलब्ध देत आहेत. व इतर पालक हे शिक्षकांशी संपर्क करून घराशेजारील ज्या व्यक्तीकडे मोबाईल आहे, त्यांच्याकडे आपल्या मुलाला अभ्यासाठी पाठवत असल्याची माहिती वाकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अशोक वळसे पाटील यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असे असले तरी पहिलीपासूनच सगळ्याच विद्यार्थ्यांना शाळा कधी सुरू होणार, याची उत्सुकता असते. यंदा शाळेची घंटाच वाजली नाही. त्यामुळे बच्चे कंपनी पूर्णपणे हिरमसून गेली आहेत. त्यामुळे आता शाळा कधी सुरू होणार, याचीच ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
 
 

Web Title: Barriers Online Learning Students Rural Areas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top