टोपली खाणार बारामतीचा कचरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

बारामती शहर - शहर कचरा डेपोमुक्त करण्याच्या दिशेने बारामती शहरात एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. शहरातील श्री छत्रपती शाहू हायस्कूल, आर. एन. आगरवाल टेक्‍निकल हायस्कूल तसेच धों. आ. सातव हायस्कूलमध्ये कचरा खाणाऱ्या टोपलीचा वापर सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी या उपक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला असल्याची माहिती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांनी दिली.

बारामतीतील प्रशांत भोसले यांनी कचरा खाणारी टोपली बांबूपासून विकसित केली आहे. त्यात जीवाणूंचे विरजण असते. त्यामुळे ही टोपली दुर्गंधी सोडत नाही. यामध्ये ओला कचरा टाकायचा असून सुका कचरा वेगळा गोळा करायचा आहे. हा कचरा यात टाकल्यानंतर काही दिवसानंतर आपोआप याचे खत तयार होते.

याची दुर्गंधीही येत नाही किंवा इतर काही दुष्परिणाम होत नाही. घरात तयार होणारा ओला कचरा हा घरातच साठवून ठेवत खतनिर्मिती करायची, जेणेकरून कचरा डेपोपर्यंत जाणारा हा कचरा आपोआपच रोखला जाईल, अशी या मागील संकल्पना आहे. या तिन्ही शाळेत प्रशांत भोसले यांनी विद्यार्थी व शिक्षकांना याबाबत मार्गदर्शन केले.

माझ्या घरापासून कचरा खाणाऱ्या टोपलीचा प्रारंभ केला आहे. कचरा डेपोपर्यंत कचरा न गेल्यास खतनिर्मिती होईलच, शिवाय कचऱ्याच्या समस्येवर मात करता येईल असा विश्वास वाटतो.
- पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा

पहिल्या टप्प्यात हजार कुटुंबातून कचरा डेपोपर्यंत जाणारा कचरा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. टप्याटप्याने बारामती शहरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न आहे.
- सचिन सातव, गटनेते

Web Title: basket baramati garbage