बिनविरोध निवडीसाठी युतीशी बोलू - हर्षवर्धन पाटील

Harshwardhan-Patil
Harshwardhan-Patil

इंदापूर - ‘बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व वंचित आघाडीशी चर्चा केली जाईल,’’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांच्या समर्थनार्थ येथे काँग्रेसच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. त्यात पाटील बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्ष जोगेंद्र कवाडे गटाने अंकिता यांना पाठिंबा दिला. अप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, अशोक घोगरे, भरत शहा, प्रशांत पाटील आदी या वेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘युवापिढीस बरोबर घेऊन समाज व तालुका एकसंध ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे. विरोधास विरोध नको असून, तालुक्‍यातील कटुता संपविण्यासाठी आपण व व्यासपीठावरील मान्यवर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकासुद्धा बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, ‘‘खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्‍याने ७१ हजारांचे मताधिक्‍य दिले आहे.

लोकसभेला काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्माचे पालन करण्यासाठी अंकिता पाटील यांना पाठिंबा दिला आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता सर्वांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य द्यावे.’’ ॲड. कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक, तर रघुनाथ पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com