"बीडीपी' आरक्षणातील बांधकामे जमीनदोस्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

कात्रज - आगम मंदिर परिसरातील जैववैविध्य उद्यान (बीडीपी) आरक्षणात उभ्या राहत असलेल्या वीस लहान-मोठ्या बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने कारवाई करून साठ हजारांहून अधिक चौरस फुटांची बांधकामे जमीनदोस्त केली. 

कात्रज - आगम मंदिर परिसरातील जैववैविध्य उद्यान (बीडीपी) आरक्षणात उभ्या राहत असलेल्या वीस लहान-मोठ्या बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने कारवाई करून साठ हजारांहून अधिक चौरस फुटांची बांधकामे जमीनदोस्त केली. 

महापालिकेच्या विभाग चारमधील धनकवडी, बिबवेवाडी, कोंढवा-वानवडी व हडपसर सहायक आयुक्त कार्यालयांची संयुक्त यंत्रणा गुरुवारी सकाळी आगम टेकडी परिसरात दाखल झाली आणि कारवाईला सुरवात झाली. बीडीपी आरक्षणात गेल्या काही महिन्यांत अनधिकृत बांधकामांना ऊत आला होता. या बांधकामांना महापालिकेने वारंवार नोटिसा पाठवल्या होत्या. कारवाईपूर्वी दोन दिवस आधी नोटिसीद्वारे सूचनाही देण्यात आल्या होत्या; परंतु तरीही बांधकामे सुरूच होती. दोन ते चार मजली इमारती बांधण्यात येत होत्या. अशा इमारतींवर महापालिकेने कारवाई करून साठ हजार चौरस फुटांहून अधिक बांधकामे पाडली. चार जेसीबी, एक पोकलेन, दोन ब्रेकर, दोन गॅस कटरच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली. 

बांधकाम विकास विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसन्न जोशी, दक्षता विभागाचे दिनेश गिरोल्ला यांच्यासह सात कार्यकारी अभियंता, बारा उपअभियंता, वीस कनिष्ठ अभियंता आणि तीस अतिक्रमण व स्थानिक पोलिस उपस्थित होते. या परिसरात वृद्धाश्रमाचे बांधकाम करणारे कारवाई न करण्याची विनंती करत होते. त्याचवेळी त्यांच्यासाठी आलेले शिवशंभू प्रतिष्ठानचे महेश कदम म्हणाले, ""वारंवार कारवाया करूनही बदल होत नसेल, तर ठोस व कायमस्वरूपी निर्णय घेतला पाहिजे. प्रबोधनासाठी माहितीचे फलक लावले पाहिजेत. या कारवाईत सर्वसामान्य फसले गेले आहेत. विकास आराखड्यासह अनेक सरकारी निर्णयासाठी वीस वर्षांचा काळ वाया गेला. याला करणीभूत राजकारणीच आहेत. मात्र, त्याचा त्रास समान्यांना व भूमिपुत्रांना होत आहे.

Web Title: BDP down the reservation in its construction