पुणे : सावधान ! आर्मीच्या गणवेशातील व्यक्ती घरात घुसून करतेय महिलांचा विनयभंग (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

आर्मी वेशभूषा असलेली एक व्यक्ती रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलांचा विनयभंग करत असल्याने वानवडी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्यक्ती सोमवारी रात्री भोसले वाडा येथे दिसला होता. काही दिवसांपूर्वी आबनावे वाडा व भैरोबा मार्ग 04 नंबर बंगला येथे घरात हीच आर्मी वेशातील व्यक्ती घुसली होती अशी माहिती समोर येत आहे. 

घोरपडी (पुणे) : आर्मी वेशभूषा असलेली एक व्यक्ती रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलांचा विनयभंग करत असल्याने वानवडी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्यक्ती सोमवारी रात्री भोसले वाडा येथे दिसला होता. काही दिवसांपूर्वी आबनावे वाडा व भैरोबा मार्ग 04 नंबर बंगला येथे घरात हीच आर्मी वेशातील व्यक्ती घुसली होती अशी माहिती समोर येत आहे. 

ही अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी गावठाणातील घरात घुसत आहे. घरातील स्रियांच्या, मुलींचा विनयभंग करत असल्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत. यामुळे वानवडीत भितीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरा पर्यंत जागे राहून नागरिक त्या व्यक्तीचा शोध घेत होते. कोणीही ही व्यक्ती तक्रार केली नसली तरी भीतीच्या वातावरणामुळे या व्यक्तीला पकडणे गरजेचे आहे. 

 

या संदर्भात स्थानिक नागरिक प्रवीण काकडे यांनी वानवडी बाजार पोलिसांना माहिती दिल्यानंतर वानवडी पोलिसांकडून सोमवारी रात्री या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु ही व्यक्ती कोठेही सापडली नसल्याने पोलिसांकडून तपास कार्य सुरु आहे. तसेच कोणालाही ही आर्मी वेषातील ६ फुट उंच व्यक्ती आढळल्यास वानवडी पोलिसांना कळवावे व शक्य असल्यास पोलीस येईपर्यंत त्या व्यक्तीला पकडण्याचे आवाहन वानवडी पोलीसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: be careful molestation of Womens from Army uniforms person in pune