पेस्ट कंट्रोल करताना अशी घ्या काळजी

पेस्ट कंट्रोल करताना अशी घ्या काळजी

अगोदर 
  घरातील किमती वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा
  खाद्यपदार्थ बंद डबे, भांड्यांमध्ये व्यवस्थित ठेवा
  औषध फवारणी योग्य ठिकाणीच होत असल्याचे तपासा
  घर व्यवस्थित बंद केल्याची स्वत- खात्री करा
  घर बंद केल्यानंतर मुख्य दरवाजाला पेस्ट कंट्रोल केल्याचा स्टिकर लावा
  रासायनिकऐवजी हर्बल प्रकारातील औषधे वापरा
  ॲल्युमिनिअम फॉस्फेटसारखी औषधे वापरू नका

नंतर
  एक-दोन तासांनंतर मुख्य दरवाजा उघडा
  नाकाला रुमाल, मास्क लावूनच घरात प्रवेश करा
  दारे-खिडक्‍या उघडून पंखा लावून हवा खेळती ठेवा
  दैनंदिन वापराचे कपडे, भांडी व अन्य वस्तू  स्वच्छ धुऊन घ्या
  भिंती, फरशी, फर्निचर व अन्य वस्तू  स्वच्छ पुसून घ्या

लहान मुले, आजारी व्यक्तींना दूर ठेवा
लहान मुले, अस्थमा किंवा कोणत्याही प्रकारचा आजार असणाऱ्या व्यक्तींना औषधफवारणी केलेल्या घरात जाऊ देऊ नये. लहान मुले, आजारी व्यक्ती किंवा कोणत्याही वस्तूंची ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींना तत्काळ त्रास होण्याची दाट शक्‍यता असते. 

आतापर्यंत झालेल्या दुर्घटना 
  सप्टेंबर २०१८ - आनंदनगर येथे साहिल (वय १०) व सार्थक डोंगरे (वय ९) या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
  नोव्हेंबर २०१५ - निगडीतील यमुनानगर येथे धवल शंकर लगाडिया (वय २४) व मंदिरा रामलाल चौधरी (वय २६) यांचा मृत्यू
  नोव्हेंबर २०१४ - शनिवार पेठेतील आकाश राजकुमार म्हेत्रे या तरुणाचा मृत्यू
  ऑगस्ट २०११ - कोथरूडमधील उषा व संध्या नाडकर्णी या जुळ्या बहिणींचा मृत्यू

नागरिकांकडून स्वस्त व कमी दरात पेस्ट कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न केला जातो. अनेकदा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्ती पेस्ट कंट्रोलचे काम करतात. त्यामुळे त्यांच्याकडून कमी दर्जाच्या किंवा मुदतबाह्य वस्तूंचा वापर होऊ शकतो. अधिकृत परवाना नसलेल्यांना काम देणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या स्वत-च्या व कुटुंबीयांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे.
- अमित लोंढे, पेस्टोक्रॉस पेस्ट कंट्रोल कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com