जाती धर्माबद्दल वक्तव्य करताना काळजी घ्या - शरद पवार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांच्याकडून टीका करण्यात आली.
sharad pawar
sharad pawarSakal
Summary

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांच्याकडून टीका करण्यात आली.

पुणे - माझ्या पक्षातील सहकाऱ्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल जी काही वक्तव्ये केली होती त्यामुळे त्यांच्यामध्ये असतानाच निर्माण झाली होती पण यावरून पक्षातील जबाबदार नेत्यांनी कोणत्याही जाती धर्माबद्दल वक्तव्ये करताना काळजी घ्या अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत. ब्राह्मण समाजाने त्यांच्या प्रगतीसाठी भगवान परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे त्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन त्यांना दिले आहे या बैठकीच्या माध्यमातून ब्राह्मण समाजामध्ये असलेली अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांच्याकडून टीका करण्यात आली. तसेच दादोजी कोंडदेव, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर वारंवर टीका होत आहे. अभिनेत्री केतकी चितळेवर राज्यभर दाखल झालेले गुन्हे, समाज माध्यमावर होणारी टीका यावरून ब्राह्मण समाजात नाराजी आहे. यासंदर्भात ब्राह्मण संघटनांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी संवाद साधण्यासाठी निसर्ग मंगल कार्यालय येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता बैठक बोलविली होती. या बैठकीला ब्राह्मण संघटनांचे सुमारे 60 प्रतिनिधी उपस्थित होते.

सुमारे दीड तास शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, आनंद दवे यांनी बैठकीसाठी वेळ मागितला होता. पण तेच आज आले नाहीत. पण महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील प्रतिनिधींना भेटायचे होते. अवस्थता होती, माझ्या सहकार्यांनी जी विधाने केली त्याची अवस्थता होती. पुन्हा या पद्धतीने जाती व धर्माबद्दल बोलू नये अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ब्राह्मण समाजाचे काही म्हणजे नाही.

ग्रामीण भागातून शहरी भागात ब्राह्मण समाज येत आहेत. सेवा क्षेत्रात त्यांना संधी आहे. त्यांना आरक्षण हवे आहे, पण लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीत ब्राह्मण समाजाचे जास्त आहे, त्यामुळे आरक्षण देता येणार नाही असे सांगितले. यावर ब्राह्मण समाजाला व्यवसायाला मदत करण्यासाठी महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली. पण हे माझ्या हातात नाही, राज्य सरकारच्या संबंधित आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करून वेळ घेऊन बाठक घेतली जाईल.

याचा तारीख दीड महिन्यात कळवू, असे सांगितले. राज्यातील वातावरण खराब झाले असे वाटत नाही. पण जबाबदार लोकांनी जाती धर्माबद्दल बोलताना काळजी घेतली पाहिजे.

मागणी केली म्हणून बैठक

ब्राह्मण समाजाच्या वास्तूसाठी बाबत मी बैठक आयोजित केलेली नव्हती ब्राह्मण समाजाला कडूनच मला भेटण्या संदर्भात विनंती करण्यात आल्याने ही बैठक घेण्यात आली कोणत्याही समाजाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली असता ती दिली गेली पाहिजे असे पवार यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com