'आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे - ‘‘आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्वतःला विकसित करा आणि नंतरच एकत्र येण्याचा विचार करा,’’ असा टोला लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला शुक्रवारी मारला.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पुणे - ‘‘आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्वतःला विकसित करा आणि नंतरच एकत्र येण्याचा विचार करा,’’ असा टोला लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला शुक्रवारी मारला.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

‘‘पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी भारताने अनेक वेळा पहिले पाऊल उचलले आहे. आता पाकिस्तानने पहिले पाऊल टाकावे,’’ असेही त्यांनी सांगितले. 

‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’च्या (एनडीए) १३५व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाच्या निमित्ताने जनरल रावत पुण्यात आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. फ्रान्स आणि जर्मनी हे एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. पण, आता ते एकत्रित राहतात. त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांनी एकत्र राहावे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकतेच म्हणाले आहेत. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना जनरल रावत म्हणाले, ‘‘दोन्ही राष्ट्रांनी एकत्र येण्यापूर्वी पाकिस्तानने त्यांची देशांतर्गत स्थिती पाहिली पाहिजे. पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र म्हणून तयार केले आहे. त्यानंतरही दोन्ही देशांनी एकत्र राहायचे असेल, तर पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून विकसित झाले पाहिजे.’’ 

इम्रान खान यांच्या विधानाचा चांगलाच समाचार जनरल रावत यांनी या वेळी घेतला.

Web Title: Be the first secular nation says Army Chief General Bipin Rawat