कोरोनानंतर रोजगार संधी शोधताना 'अशी' असावी मानसिकता: सांगताहेत फायनास अॅडवायझर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या (आयआयएमएस) वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'कोरोना संकटानंतरच्या आर्थिक क्षेत्रातील रोजगार संधी' या विषयावरील वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. 
 

पुणे : रोजगार संधी शोधताना अनुकूल परिस्थितीसाठी आशावादी राहून प्रतिकूलतेसाठी सज्ज राहण्याची मानसिकता युवकांनी विकसित करावी असे  आवाहन अर्थ सल्लागार सीमा जगताप यांनी केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या (आयआयएमएस) वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'कोरोना संकटानंतरच्या आर्थिक क्षेत्रातील रोजगार संधी' या विषयावरील वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. 
Image may contain: 1 person, closeup

पंढरपूरची वारी करण्यासाठी तरुणाने लडढवली शक्कल

यावेळी जगताप म्हणाल्या, "भांडवली बाजाराची जागरूकता कमी असल्याने व्यक्तिगत विमा क्षेत्रात  भविष्यात चांगल्या रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. 
उद्योग व्यवसायाच्या  नवनवीन  कल्पना व नवे तंत्रज्ञान  यांचे  महत्व युवकांनी लक्षात घ्यावे असेही जगताप यावेळी म्हणाल्या. या वेबिनारमध्ये विविध व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी  झाले होते. तर या वेबिनारसाठी समन्वयक म्हणून प्रा.महेश महांकाळ यांनी काम पाहिले. 

एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be optimistic for the good and be ready for the bad said Finance Advisor Seema Jagtap