#SaathChal पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण 

राजकुमार थोरात
शनिवार, 14 जुलै 2018

वालचंदनगर : बेलवाडी (ता.इंदापूर) येथे जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणाची तयारी पूर्ण झाली असून रविवार (ता. 15) रोजी पहिला गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे.

वालचंदनगर : बेलवाडी (ता.इंदापूर) येथे जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणाची तयारी पूर्ण झाली असून रविवार (ता. 15) रोजी पहिला गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज शनिवार (ता.14) रोजी इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश करीत आहेत. सणसर येथील मुक्काम आटपून पालखी सोहळा रविवारी सकाळी बेलवाडीच्या गोल रिंगणासाठी मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळ्यातील पहिलेच गोल रिंगण असल्याने इंदापूर, बारामती, माळशिरस, फलटण तालुक्यातील नागरिक रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी करीत असतात. तसेच पालखी सोहळ्यातील वैष्णाव ही रिंगणाचा आनंद घेत असतात. रिंगण सोहळ्यामध्ये मेंढ्या, पताकेवाले, विणेकरी, टाळ-मृंदुग तसेच महिला तुळस डोक्यावरती घेवून देह हरपून धावत असतात.  

रिंगण सोहळ्यामध्ये शेवटी अश्‍वांचे रिंगण होते. अश्‍वांनी पालखीला तीन फेऱ्या मारल्यानंतर रिंगण सोहळा पूर्ण होत असतो. रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी रिंगण सोहळ्याची पाहणी केली. तसेच बेलवाडीचे सरपंच माणिक जामदार, छत्रपती सहकारी साखर कारखान्याने माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, विद्यमान संचालक सर्जेराव जामदार, हनुमंत खैरे, ग्रामसेवक अन्सार सय्यद, अनिल लोंढे यांनी आज रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यामध्ये गुंतले होते. बेलवाडी रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी सोहळा दुपारी विश्रांती घेवून निमगाव - केतकीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.

Web Title: Beat the first round of the Palkhi festival