दैवी शक्ती आणण्यासाठी महिलेला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

खेड-शिवापूर - आर्वी (ता. हवेली) येथे अंगात दैवी शक्ती आणण्याच्या बहाण्याने एका महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार घडला.  राजगड पोलिसांनी याप्रकरणी मारहाण करणारा भगत राजू कोंडे, त्याची पत्नी, पीडित महिलेची सासू आणि दीर यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला.

अंगात दैवी शक्ती आणण्यासाठी सुनेला तिचे सासरचे लोक आर्वी येथील कोंडे या भगताकडे सलग पाच दिवस घेऊन येत होते. या वेळी कोंडे आणि त्याची पत्नी संबंधित महिलेला दररोज अंगात दैवी शक्ती आणण्यासाठी वेताची काठी आणि आसुडाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करायचे. गेल्या पाच दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकाराने या पीडित महिलेला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला आहे. हा प्रकार समजल्यानंतर पीडित महिलेच्या माहेरच्यांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकाराबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव आणि राज्य सचिव मिलिंद देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अंनिसच्या पुढाकाराने या पीडित महिलेच्या आजीने राजगड पोलिसात तक्रार दिली. 

Web Title: beat a woman to bring divine power in khed shivapur