esakal | अमेरिकन महिलेकडून मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकन महिलेकडून मारहाण

खरेदीसाठी जाणाऱ्या महिलेस तुम्ही मुस्लिम आहात का? असे विचारून एका अमेरिकन महिलेने शिवीगाळ व मारहाण केल्याच्या दोन घटना शहरामध्ये घडल्या. लुईस जॅमी लायन (वय ४३, सध्या रा. लष्कर परिसर, मूळ अमेरिका) असे या अमेरिकन महिलेचे नाव असून, तिच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अमेरिकन महिलेकडून मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - खरेदीसाठी जाणाऱ्या महिलेस तुम्ही मुस्लिम आहात का? असे विचारून एका अमेरिकन महिलेने शिवीगाळ व मारहाण केल्याच्या दोन घटना शहरामध्ये घडल्या. लुईस जॅमी लायन (वय ४३, सध्या रा. लष्कर परिसर, मूळ अमेरिका) असे या अमेरिकन महिलेचे नाव असून, तिच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिला मायदेशी पाठविण्यासाठी पोलिसांनी अमेरिकन दूतावासाशी संपर्क केला आहे.

याप्रकरणी २२ वर्षीय डॉक्‍टर महिलेने तक्रार दिली आहे. फिर्यादी महिला रविवारी (ता.१) दुपारी लष्कर परिसरातील क्‍लोअर सेंटर येथील मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी एका महिलेने त्यांना ‘तुम्ही मुस्लिम आहात का’, अशी इंग्रजीमध्ये विचारणा केली, त्यास या महिलेने होकार दर्शविला. त्यानंतर लुईसने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर लष्कर पोलिसांनी संबंधित महिलेला बोलावून यापुढे असे प्रकार न करण्याबाबत समज दिली आहे. 

पर्यटन व्हिसावर पुण्यात वास्‍तव्य
ही महिला पर्यटन व्हिसावर  पुण्यामध्ये वास्तव्य करीत असून, तिला मायदेशी पाठविण्यासाठी पुणे पोलिसांच्या परकी नागरिक नोंदणी विभागाने अमेरिकन दूतावासासमवेत पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, इंडियन मुस्लिम फ्रंटचे (आयएमएफ) सदस्य मुन्वर कुरेशी यांच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन महिलेवर कारवाईची मागणी केली आहे.

loading image
go to top