हिंजवडीत हॉटेलचालकाला पाच जणांकडून मारहाण 

beating hotel owner in hinjwadi
beating hotel owner in hinjwadi

हिंजवडी  : "आम्ही पोलिस आहोत, आमच्या माणसाला त्या दिवशी दारू का दिली नाही,' असा जाब विचारत पाच जणांनी हॉटेलचालकाला मारहाण केल्याची घटना हिंजवडीतील एका नामांकित हॉटेलमध्ये सोमवारी (ता. 5) मध्यरात्री घडली. तसेच, त्यातील एकाने हॉटेलच्या बाजूला असलेल्या चायनीज गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी हॉटेलचालक रामकिसन रमेश खैरनार (वय 32, रा. हिंजवडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला कर्मचारी अक्षय धुमाळ याच्यासह अजय खोत आणि इतर तिघांविरोधात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील अजय खोत आणि महेंद्र रोकडे, जयंत साळुंके (तिघेही रा. भवानी पेठ पोलिस वसाहत, बैठी चाळ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे; तर धुमाळ आणि आणखी एक साथीदार फरार आहे. त्याचे नाव अद्याप कळलेले नाही. धुमाळ हा पुणे पोलिस आयुक्तालयात पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहे. 

सोमवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हे सर्वजण या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे त्यांनी खैरनार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, जाताजाता बाजूला असलेल्या चायनीज गाड्यांची तोडफोड केली. 

हॉटेलच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न 
या घटनेमुळे पहाटेपर्यंत बिनदिक्कतपणे सुरू राहणाऱ्या हिंजवडीमधील हॉटेल, चायनीज गाड्या, चौपाट्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. हिंजवडीतील "नाइटलाइफ'ला पोलिसांचे अभय असल्याची चर्चा परिसरामध्ये जोरदार रंगली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com