जमीन नावावर करण्यासाठी काठीने आई-वडीलांना मारहाण; उरुळी कांचन येथील घटना

Crime
Crime

उरुळी कांचन (पुणे) - जमीन नावावर करण्यासाठी मध्यपी मुलाने जन्मदात्या आई-वडीलांना बांबुच्या काठीने बेदम मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेमंत किसन टिळेकर (वय ३५, रा. उरुळी कांचन ता. हवेली) हे त्या मध्यपी मुलाचे नाव असुन, त्याने वडील, किसन (वय- 62) व आई अलका (वय- 58) या दोघांना रविवारी (ता. 25) रात्री साडेआठ वाजनेच्या सुमारास मारहान केली आहे. या प्रकरणी किसन दशरथ टिळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी हेमंत याच्या विरोधात मारहानीचा गुन्हा दाखल केला आहे. 

लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन टिळेकर मागील सतरा वर्षापासुन ऊरूळी कांचन येथील स्मशानभुमीत सेवक म्हणून काम करतात. किसन व त्याच्या पत्नीला राहण्यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायतीने स्मशआनभुमितच छोटी खोली बांधुन दिली आहे. या खोलीतच किसन, त्यांची पत्नी अलका व मुलगा किसन राहतात. रविवारी रात्री साडेआठ वाजनेच्या सुमारास हेमंत दारुच्या नशेत घरी आला. घऱी येताच, त्याने किसन यांना जमिन नावलाकर का करत नाही असे म्हणुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र किसन यांनी जमीन नावावर करण्यास नकार दिला. किसन यांच्याकडुन नकार मिळताच, हेमंत याने किसन यांना घऱाजवळ पडलेल्या बाबुंच्या साह्याने बेदम मारहान करण्यास सुरुवात केली. 

दरम्यान मुलगा बापाला मारहान करत असल्याचे पाहुन, अलका यांनी हेमंतला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र हेमंत याने वडीलांच्याबरोबर आईलाही बाबुंच्या साह्याने बेदम मारहान करण्यास सुरुवात केली. किसन व अलका हे दोघेही जमिनीवर पडले तरी, हेमंतने मारहान सुरुच ठेवली होती. हेमंतची मारहान सहन  न झाल्याने, अलका यांनी 

स्मशाभूमीजवळच असलेल्या इंदीरागनार मधील सतिश साळवे व त्यांचेबरोबर आणखी एक इसमास आवाज देऊऩ बोलावुन घेतले. वरील दोघांनी हेमंतला बाजुला करत, वरील  दोघांनाही हेमंतच्या तावडीतुन सोडवले. तसेच मारहानीमुळे जखमी झालेल्या किसन व त्यांची पत्नी अलका यांना उपचारासाठी उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्नालयात दाखल केले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधऱी करत आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com