पोलिस कर्मचाऱ्याला दोघांची धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे - हॉटेलबाहेर वाद घालणाऱ्या दोघांना समज देणाऱ्या पोलिसाला दोघांनी धक्काबुक्की केली. ही घटना चांदणी चौकात घडली. या प्रकरणी ओंकार शंकर कुडले (वय २४) आणि सूरज एकनाथ टेमगिरे (वय २७) या संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई पी. बी. गायकवाड यांनी कोथरूड ठाण्यात फिर्याद दिली. कुडले व टेमगिरे शनिवारी मध्यरात्री चांदणी चौकातील एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे दोघांनी रात्री उशिरापर्यंत मद्यपान केले. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास दोघेही हॉटेलबाहेर येऊन भांडण करत होते. याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर गायकवाड तेथे आले. त्यांनी दोघांना समज दिली.

पुणे - हॉटेलबाहेर वाद घालणाऱ्या दोघांना समज देणाऱ्या पोलिसाला दोघांनी धक्काबुक्की केली. ही घटना चांदणी चौकात घडली. या प्रकरणी ओंकार शंकर कुडले (वय २४) आणि सूरज एकनाथ टेमगिरे (वय २७) या संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई पी. बी. गायकवाड यांनी कोथरूड ठाण्यात फिर्याद दिली. कुडले व टेमगिरे शनिवारी मध्यरात्री चांदणी चौकातील एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे दोघांनी रात्री उशिरापर्यंत मद्यपान केले. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास दोघेही हॉटेलबाहेर येऊन भांडण करत होते. याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर गायकवाड तेथे आले. त्यांनी दोघांना समज दिली. त्यानंतर कुडले व टेमगिरेंनी गायकवाड यांना धक्काबुक्की केली.

Web Title: Beating to police crime

टॅग्स