ड्रेनेजचे काम न केल्याच्या कारणाने महापालिकेच्या मुकादम मदतनीसाला मारहाण 

crime-logo.jpg
crime-logo.jpg

पुणे : घरासमोरील ड्रेनेज लाईनचे काम न केल्याच्या कारणावरुन महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम मदतनीसाला एकाने शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी येथील आरोग्य कोठीच्या परिसरात घडली. 

याप्रकरणी सुर्यकांत गवळी (वय 40, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन शरद जाधव (रा. आरोग्य कोठीसमोर, गुलटेकडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये आरोग्य विभागाचे मुकादम मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी येथील आरोग्य कोठीमध्ये सेवकांची हजेरी घेत होते. त्यावेळी शरद जाधव हा तेथे आला. त्याने फिर्यादी यांना ''माझ्या घरासमोरील ड्रेनेज लाईनचे काम का केले नाही' अशा शब्दात दमदाटी करीत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर फिर्यादी यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी जाधव विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com