योग्य ती काळजी घेत ब्यूटी पार्लर झाले सुरू पण... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

लॉकडाउनमुळे तब्बल तीन महिन्यांच्या बंदीनंतर सलून व ब्यूटीपार्लर या व्यवसायांना पुन्हा सुरू करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली आहे. रविवार (ता. 28) पासून शहरातील विविध भागांमध्ये असलेले ब्यूटी पार्लर पुन्हा सुरू झाले आहेत.

पुणे : लॉकडाउनमुळे तब्बल तीन महिन्यांच्या बंदीनंतर सलून व ब्यूटीपार्लर या व्यवसायांना पुन्हा सुरू करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली आहे. रविवार (ता. 28) पासून शहरातील विविध भागांमध्ये असलेले ब्यूटी पार्लर पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, ब्युटीपार्लर मध्ये आता कॅश ऐवजी ऑनलाइन पेमेंटवर भर दिला जात आहे.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

लॉकडाउनपूर्वी पार्लरमध्ये महिलांची लगबग असायची आयब्रो पासून ते हेअरस्टाईल पर्यंत सर्व काही करण्यासाठी पार्लर हा मार्ग शोधला जात असे. परंतु, लॉकडाउनच्या कालावधीत मात्र महिलांचा हा पर्याय बंद होता. दरम्यान, रविवारपासून पुन्हा ब्युटीपार्लर सुरू झाल्याने आता महिलांची चिंता मिटली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्लरचालक सुद्धा विशेष खबरदारी घेत आहेत.

 पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

सध्या प्रत्येक ग्राहकाला अपॉइंटमेंट देत आहोत. तर नोकरदार महिलांना त्यांच्या सुट्टीच्याच दिवशी अपॉइंटमेंट देत आहोत. तसेच सर्व उपकरणे आणि पार्लर मधील वस्तू वेळोवेळी सॅनिटायझ करून ठेवली जात आहे. त्याच बरोबर प्रत्येक दोन तासांनी पार्लर पूर्णपणे सॅनिटायझ करत आहे. या व्यवसायात सोशल डिस्टनसिंग पूर्णपणे शक्य नसल्याने जमेल तितकं शारीरिक अंतर राखून सेवा देत आहोत. अशी माहिती वृषाली'ज ब्यूटी सलून, स्पा अॅण्ड इन्स्टिट्यूटच्या संचालिका वृषाली सचिन शेडगे यांनी दिली. 

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

"प्रत्येक ग्राहकासाठी आम्ही 'यूझ अँड थ्रो' वस्तू वापरत आहोत. त्यामुळे, आमचा खर्च ही वाढला आहे. मागील तीन महिने कोणतेच काम नसल्याने आता काम सुरू होऊन देखील खर्च पण वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक सेवेच्या मागे 50 ते 100 रुपये दर वाढवले आहेत."
- वैशाली वाघ, शाज ब्युटीपार्लर
 

अशी घेत आहोत खबरदारी

  • वॅक्सिंगसाठी यूझ अँड थ्रो वस्तू
  • ग्राहकांची पूर्व अपॉइंटमेंट त्यामुळे गर्दी टाळणे शक्य
  • दररोज केवळ तीन ते चार ग्राहकच घेण्यात येतील
  • ब्यूटी पार्लरमधील कर्मचाऱ्यांना वार ठरवून दिले आहेत
  • प्रत्येक कर्मचाऱ्याने केवळ दोन ग्राहकांनाच सेवे देणे
  • प्रत्येक ग्राहकानंतर पार्लर पूर्णपणे स्वच्छ करणे व सॅनिटायझेशन करणे
  • मास्क आणि ग्लॅव्हजचा वापर न चुकता केला जातोय

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beauty parlor resumes after a period of three months