पुण्यात ब्यूटीपार्लरची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे : विकी कुमारी कुँवरसिंग या महिलेचे कोथरुड येथे ब्यूटीपार्लरचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी दोन अनोळखी तरुणांनी दुकानात घुसून फ्रँचायजीचा बोर्ड काढण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने त्यांना विरोध केला. त्यानंतर वाद वाढल्याने महिलेने पोलिसांना बोलाविले, त्यावेळी प्रकरण शांत झाले. पोलिसांनी याबाबतपोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी महिलेने तक्रार दाखल केली.

आज सकाळी महिला आपले ब्यूटीपार्लरचे दुकान उघडण्यासाठी गेली असता त्यावेळी तिला दुकानाची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. सीसीटिव्ही चित्रीकरण तपासले त्यावेळी काल रात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या चार तरुणांनी दुकानावर दगडफेक करून तोडफोड केल्याचे निदर्शनास आले.
 
Web Title: Beauty Parlor store broken in Pune