मावळातील डोंगर होतायेत बकाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

बेबडओहोळ - पवन मावळ, नाणे मावळ व आंदर मावळ परिसरात वृक्षांची बेसुमार कत्तल व वणव्यामुळे येथील डोंगर बकाल होत चालले आहेत. त्याची वेळीच दखल वन विभागाने घ्यायला हवी. 

गेल्या वीस वर्षांत मोठ्या झपाट्याने येथील वातावरण बदलत आहे. डोंगर परिसरात तुटपुंज्या पैशांसाठी ठेकेदाराद्वारे व इंधन म्हणून झाडांची कत्तल केली जात आहे. त्यातूनही जगलेली व थोडीफार असणारी झाडेही दरवर्षी लागणाऱ्या वणव्यात जळून जात आहेत. सध्या सर्वच डोंगर बकाल झाले आहेत.

भूमाफियांकडून व प्लॉटिंगमुळे दरवर्षी हजारो झाडांची कत्तल करण्यात येते. नियम धाब्यावर बसवून हे सर्व होत आहे. मात्र, याकडे ना वन विभागाचे लक्ष आहे ना तहसीलदारांचे. शेतकरी शेतीची लेवल करताना झाडे कापण्याचे काम काही ठेकेदारांना देतात. काही तासांतच मशिनद्वारे मोठ्या प्रमाणात झाडे कापण्यात येतात व ती वजन करून किलो व टनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते. आज अशाप्रकारे प्लॉटिग व शेती लेवलच्या माध्यमातून दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होते. रस्त्याच्या वेळी अडथळा म्हणून ठरणारी झाडेही तोडण्यात येतात. मात्र, त्याबदल्यात अन्य ठिकाणी झाडे लावली जात नाहीत. गावातील मध्यवर्ती, पाराजवळ व सार्वजनिक ठिकाणी असणारी झाडेही गावातल्या काही पुढारी व लोकांच्या मनमानी पद्धतीने काढली जातात. याबाबत कुठलीही परवानगी घेतली जात नाही. अशा अनेक कारणांमुळे तालुक्‍यात दरवर्षी झाडांचे प्रमाण कमी होत आहे. याला लगाम बसवणे व झाडे तोडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत वन विभाग अधिकारी व्ही. व्ही. गायकवाड यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘आम्हाला झाडांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यास आम्ही कारवाई करतो.’’

वृक्ष का घटतात
 दरवर्षी लागणारे वणवे 
 वाढते नागरीकरण
 इंधनासाठी वापर
 जमिनीचे वाढते सपाटीकरण
 वृक्षतोडीकडे दुर्लक्ष

Web Title: bebadovol news maval news mountain