बिबट्याच्या अफवेमुळे खराडेवाडीकरानी रात्र काढली जागून

विजय मोरे
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

उंडवडी - खराडेवाडी ( ता. बारामती) परिसरात बिबट्या आलेच्या अफवेने शुक्रवारची संपूर्ण रात्र ग्रामस्थांना जागून काढावी लागली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत एकमेकांना फोन आणि सोशल मिडिया- व्हॅट्सॲपवर बिबट्या शेतात लपून बसल्याचे मेसज फिरत होते. 

शुक्रवारी सायंकाळी शाळेतील मुलांना व काही ग्रामस्थांना एक वेगळा वन्य प्राणी खराडेवाडी परिसरात दिसला. बिबट्या शेतात दिसल्याची खबर परिसरात काही वेळातचं पसरली. रात्री आठ नंतर अनेक व्हॅट्स ॲप ग्रूपवर हे मेसज फिरु लागले. मग खात्री करण्यासाठी अनेकांचे एकमेकांना फोनही सुरु झाले. बिबट्याची भिती घेतलेल्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. 

या भागातील शेतकऱ्यांचे पशुधन गोठ्यात आणि उघड्यावर बांधलेले असल्याने लोकांना कडक पहारा लावून 'जागते रहो' ची मोहिम राबवावी लागली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असून यामध्ये वेगवेगळे वन्यप्राणी आहेत. मात्र बिबट्या नाही. मग हा बिबट्या आला कोठून याचा अनेकजण शोध घेत होते. मात्र दिवसभर कोठेही बिबट्या दिसला नाही. 

वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे वनपाल अमोल पाचपुते आपल्या कर्मचाऱ्यासमवेत खराडेवाडी परिसरात दाखल झाले. पाचपुते यांनी येथील ग्रामस्थांना वेगवेगळ्या प्राण्यांचे छायाचित्र दाखवल्यानंतर ग्रामस्थांनी तो प्राणी 'तरस ' असल्याचे स्पष्ट झाले. बिबट्या आलेची अफवा पसरली, हे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला. 

याबाबत वनविभागाचे वनपाल श्री. पाचपुते म्हणाले, " या भागातील वनक्षेत्रात 'तरस' हा प्राणी आहे. मात्र तो लोकांसाठी व पाळीव प्राण्यांसाठी उपद्रवी नाही. त्यामुळे लोकांनी घाबरुन जावू नये. तरस लोकांना घाबरुन पुन्हा वनक्षेत्रात गेला असेल. " 

Web Title: because of leopard news no one sleeps in the area