बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे युवापिढीत नैराश्य : हर्षवर्धन पाटील

बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे युवापिढीत नैराश्य : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : जीवघेण्या स्पर्धेच्या युगात नोकऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे युवापिढीमध्ये नैराश्येची भावना वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर युवापिढीमधील कौशल्याच्या आधारे उद्योजकता विकसित करण्यासाठी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कौशल्य विकासावर आधारित विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून महाविद्यालयातील प्रथम वर्ष ते पदव्युत्तर वर्गापर्यंत विद्यार्थ्यास दरवर्षीप्रमाणे पाच तर प्रथमवर्ष ते पदवीपर्यंत तीन अभ्यासक्रम पूर्ण करता येतील. मोबाईल दुरूस्ती, हस्‍ताक्षर, वेब डिझायनिंग, एमएस ऑफिस, स्नेक हँडलिंग अँड अवेअरनेस, लँग्वेज बेसिक, मोडी लिपी, प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ मार्केटींग, प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ बँकिंग, ग्रामीण विकासातील शासकीय धोरणांची माहिती, बर्ड डायव्हर्सिटी, फोटोशॉप, लॅबरोटरी सायन्स, जी. एस. टी, माती परीक्षण, ब्युटीपार्लर, स्पोकन इंग्लिश, योगा आणि फिटनेस यांसारखे 45 अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील 30 अभ्यासक्रमांसाठी शंकररावजी पाटील ट्रस्टच्या माध्यमातून इंदापूर महाविद्यालयाने पाच वर्षांसाठी करार केला असून, विद्यार्थ्यांना दरवर्षी यातील एक अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्याची माहिती मिळणार असून विद्यार्थी व्यवसायाभिमुख कौशल्य प्राप्त करणार आहेत. त्यामुळे ग्रामीण, निमशहरी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, त्यामुळे शहराचे वाढते नागरीकरण कमी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा, संचालक विलास वाघमोडे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विजय नारखेडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुधाकर जाधवर, डॉ. शोभा इंगवले, डॉ. पंडित परदेशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com