चुकीच्या फलकामुळे वृद्ध दांपत्य हैराण

रवींद्र जगधने 
शनिवार, 14 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) :"अश्‍विनी ताईंचे कार्यालय कुठे आहे'' या वेळीअवेळी दररोजच्या चौकशीला निगडी, सेक्‍टर 21 मधील (प्रभाग क्रमांक 11) वृद्ध दांपत्य हैराण झाले आहे. नगरसेविकेचे जनसंपर्क कार्यालय समजून अनेक जण त्यांच्या घराची बेल वाजवत आहेत. त्यामुळे याबाबत संबंधित नगरसेविकेला त्या कार्यालयाच्या फलकाची जागा बदलण्याची विनंती करण्याची पाळी त्यांच्यावर ओढवली आहे. मात्र, त्याची अद्याप दखल न घेतल्यामुळे दांपत्य पुरते हतबल झाले आहे. 

अश्‍विनी भीमा बोबडे असे त्या नगरसेविकेचे नाव असून बोबडे या भाजपच्या प्रभाग क्रमांक 11 मधील विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांचे निगडी, सेक्‍टर 21 येथील दुर्गा चौकाजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. मात्र, त्यांच्या कार्यालयाचा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्याऐवजी अशोक इप्पा (वय 68) यांच्या आशियाना बंगल्यालगत पदपथावर लावला आहे. त्यामुळे बोबडे यांचे कार्यालय समजून अनेक जण इप्पा यांच्या घरी बेल वाजवतात.

बेल वाजल्यामुळे इप्पा दांपत्य त्यांच्या दराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन चौकशी करते. त्यावेळी अश्‍विनी ताईंचे कार्यालय कुठे आहे, अशी विचारणा होते. दररोज रात्री-अपरात्रीच्या या चौकशीला इप्पा दांपत्य गेल्या चार महिन्यापासून झेलत आहे. तसेच फलक पदपथावर असल्याने तो पादचाऱ्यांच्या डोक्‍याला लागत असल्याचे इप्पा यांनी सांगितले. 

असाही आला अनुभव 
दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या बारा लोकांनी त्यांच्याकडे अशीच चौकशी केली. मात्र, कार्यालय दुसरीकडे असल्याचे सांगताच, मग फलक इथे का लावला आहे. त्यांना सांगा दुसरीकडे फलक लावायला, असाही सल्ला दिला. 

शेजारील इमारतीच्या वरच्या मजल्यावर संपर्क कार्यालय असून फलक इमारतीच्या खालीच आहे. तसेच मी राहण्यासाठीही त्याच परिसरात आहे. तरी कोणाला त्रास होत असेल तर याबाबत विचार केला जाईल, असे नगरसेविका अश्‍विनी बोबडे यांनी सांगितले. 

Web Title: because of wrong board a couple get frustrated

टॅग्स