लेखक बनण्यासाठी बारकाईने निरीक्षण करा - अवचट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे-  आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा. त्यातून तुम्हाला आवडेल ती घटना, व्यक्ती, तिच्याबद्दल तुमचे मत अशा गोष्टींची नेहमी नोंद ठेवा. एक चांगला लेखक होण्यासाठी यातून मोठी मदत मिळेल, असा गुरुमंत्र देत ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी विद्यार्थ्यांना लेखन कलेची ओळख करून दिली. 

बालदिनाचे औचित्य साधून मेहता पब्लिशिंग हाउस आणि शिक्षण विवेक यांच्या "बोलगप्पा' उपक्रमांतर्गत आयोजित "लेखक आपल्या भेटीला' या कार्यक्रमात अवचट यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक के. एन. अरनाळे, उपमुख्याध्यापिका भारती तांबे, शिक्षण विवेकच्या प्रतिनिधी गायत्री जवळीकर व मेहता पब्लिशिंग हाउसच्या गायत्री पाठक उपस्थित होत्या. 

अवचट म्हणाले, ""लेखक पुस्तकात लिहितो त्याही आधी तो माणूस म्हणून आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे परीक्षण करत असतो. त्यातून त्या घटनांचा इतरांवर होणारा परिणाम समजतो.'' 

विद्यार्थिदशेत असताना अभ्यासाबरोबरच आपल्यात असलेल्या कलांना विसरता कामा नये, हाही संदेश त्यांनी मुलांपर्यंत पोचवला. सूत्रसंचालन रसिका लिमये यांनी केले. 

Web Title: To become a writer Monitor closely - Avchat