organ donation : बीडच्या 'ब्रेन डेड' झालेल्या युवकांने दिले तिघांना जीवदान

organ donation : बीडच्या 'ब्रेन डेड' झालेल्या युवकांने दिले तिघांना जीवदान

पुणे : बीडवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 27 वर्षांच्या तरुणाचा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला जबरी मार लागला. उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सलग चार-पाच दिवस त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र. त्याच्या मेंदूचे कार्य थांबले (ब्रेन डेड). अशा अवस्थेत त्याच्या 21 वर्षाच्या पत्नीने अवयवदानाचा निर्धार केला. त्यामुळे तीन रुग्णांना नवे जीवन मिळाले.

ब्रेन डेड रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्याचे यकृत व मूत्रपिंड दान करण्याचे ठरविले. लिव्हर सिरॉसिसच्या आजारामुळे शेवटची घटका मोजणाऱ्या चाकण येथील एका 32 वर्षीय पुरुष रुग्णावर हे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. 46 वर्षीय रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात या शस्त्रक्रिया झाल्या. मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यासाठी मूत्रपिंड दुसऱ्या रुग्णालयात पाठविले.

डॉ. विभूती म्हणाले, “अत्यंत अल्प काळात 91 टक्के यशाच्या प्रमाणाबरोबर या सर्व रुग्णांची सेवा केली आहे. दोनशे प्रत्यारोपणाचा हा आव्हानात्मक टप्पा गाठताना एकावेळी यकृत, मूत्रपिंड व स्वादुपिंड अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.”


सह्याद्री हॉस्पिटल्सचे प्रमुख डॉ. केतन आपटे म्हणाले, “200 यकृत प्रत्यापरोपणामध्ये जवळजवळ 150 यकृत प्रत्यारोपणांसाठी सह्याद्रि हॉस्पिटल्सने सामाजिक संस्थांच्या मदतीने काही प्रमाणात आर्थिक साहाय्य करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या डॉक्टरांचे, कर्मचाऱ्यांचे आणि झेडटीसीसी आणि वाहतूक पोलिसांच्या टीमचे अभिनंदन करतो, ज्यांनी हा महत्त्वपूर्ण टप्पा साध्य करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.”

प्रत्यारोपण पथकात यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. बिपिन विभूते, डॉ. दिनेश झिरपे व डॉ. अनिरुद्ध भोसले, हेपॅटॉलॉजिस्ट डॉ. शीतल महाजनी, पेडिअट्रिक हेपॅटॉलॉजिस्ट डॉ. स्नेहवर्धन पांडे, क्लिनिकल असोसिएट डॉ. अभिजित माने, प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक व डॉ. किरण थत्ते, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अतुल सजगुरे , मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. केतन पै, शल्यविशारद डॉ. संजय कोलते, डॉ. अद्वैत कोठुरकर , भुलतज्ज्ञ डॉ. विकास करणे व वंदना घुडे, प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे, अरुण अशोकन, अमन बेले, चेतन चौधरी आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com