सिंहगडवर आग्या मोहोळाच्या मधमाशा पर्यटकांना चावल्या

चार- पाच जण बेशुद्ध पडले आहेत
Police on Sinhagad
Police on SinhagadSakal

खडकवासला - सिंहगडावरील कल्याण दरवाजा परिसरात 25 हून अधिक पर्यटकांना मधमाशा चावल्या. चार- पाच जण बेशुद्ध पडले आहेत. यातील जखमींना रुग्णवाहिकाने रुग्णालयात आणले आहे. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिक वन विभागाचे कर्मचारी वन संरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक घटना स्थळी धावले.

कल्याण दरवाजा परिसरात झाडावर आणि खडकाला आठ- नऊ आग्या मधमाश्यांची पोळी आहेत. काही तरूण या परिसरात जाऊन फोटो काढत होते. फोटो काढताना झाडाची फांदी तुटली. मधमाशा त्यातून बाहेर पडल्या. दिसेल त्या व्यक्तीला मधमाश्या चावायला सुरुवात केली. या परिसरात असलेल्या अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्या ठिकाणी आगीचे टेंभे लाकूड पाला पाचोळा याचा धूर आणि घोंगडी करून त्यांना वाचवण्यात आणि कार्यकर्ते मदत करत आहेत.

यावेळी गडावरील यामध्ये गडावरील माजी उपसरपंच अमोल पढेर, ओंकार पढेर, भाऊ जोरकर, दत्ता जोरकर नंदू जोरकर, वनपाल बाबासाहेब लटके, बाळासाहेब जिवडे आकाश बांदल, राकेश पन्हाळकर आणि कार्यक्रमातील स्वयंसेवक मदतीला धावले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिकेतून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे.

उन असल्यावर पर्यटक गडावर फिरत नाही. पण गडावर कालच पाऊस झाला आहे. गडावर ढगाळ वातावरण व वारा असल्याने आल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटक एका जागेवर बसता गडावर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे. आज गडावरील सर्व ठिकाणी म्हणजे कल्याण दरवाजा, तानाजी कडा, छत्रपती राजाराम महाराज समाधी, झुंजार माची अशा ठिकाणी फिरताहेत. कल्याण दरवाजा परिसरात पर्यटकांची देखील चांगली गर्दी होते.

एका संस्थेचे तिथीनुसार राज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन केलं होत. त्यामुळे तानाजी मालुसरे यांची समाधी आणि जिल्हा परिषदेचे विश्रामगृह या परिसरात गर्दी होती. देवटाका परिसरात पर्यटक पाणी पिण्यासाठी गर्दी केली होती. अशा परिस्थितीत दोन सव्वा वाजण्याच्या सुमारास पर्यटकांना मधमाशी चावल्याची घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com