चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्यास सुरुवात

राजेंद्र लोथे
सोमवार, 16 जुलै 2018

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून तो 65 टक्क्यांवर पोहोचला आहे.

चास - खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून तो 65 टक्क्यांवर पोहोचला आहे.

14 जुलै रोजी फक्त 38 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा केवळ 44 तासांत 65 टक्क्यांवर पोहोचल्याने पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या एक ते दोन दिवसात धरण शंभर टक्के भरणार आहे धरणातील पाणीसाठा 95 टक्यांच्या आसपास गेल्यावर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे दरवाजे उघडून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागणार आहे. त्यामुळे भीमानदी पात्राच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाचे वतीने सहाय्यक अभियंता अशोक मुरुडे तसेच शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्याची पाण्याची गरज पाहता आज पासून धरणातून 400 क्यूसेक्स वेगाने कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे कालव्यातून पाणी सोडल्याने धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला असून तासाला 1.8 मेगा वीजनिर्मिती सुरू झाली आहे

Web Title: Beginning to grow rapidly water in Chaskaman Dam