‘मिलन-२०२२’ची सुरुवात; ३९ देशांच्या नौदलांचा सहभाग

अमेरिकेने पहिल्यांदा घेतला सहभाग
भारतीय नौदलाच्या ‘मिलन-२०२२
भारतीय नौदलाच्या ‘मिलन-२०२२

पुणे: भारतीय नौदलाच्या ‘मिलन-२०२२’ या बहुराष्ट्रीय नौदल सरावाची सुरवात झाली आहे. यामध्ये एकूण ३९ देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला होता. मिलन या सरावात अनेक देशांनी सहभाग नोंदविला असल्याने या सरावाचे आयोजन यंदा प्रथमच विशाखापट्टणम येथे करण्यात आले आहे. सरावाचा पहिला टप्पा २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ‘हार्बर फेज’ आणि १ ते ४ मार्च या कालावधीत ‘सी-फेज’ अशा स्वरूपात पार पडेल.

भारतीय नौदलाच्या ‘मिलन-२०२२
Pune Corporation Election: निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे

‘मिलन’ या नौदल सरावाच्या माध्यमातून भारतीय नौदलाची बहुआयामी मानसिकता, सज्जता त्याचबरोबर शिस्त यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जगातल्या विविध देशातील नौदलांमध्ये समन्वय वाढावा, सागरी सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य मोहिमा राबविणे, एकमेकांच्या तंत्रज्ञान, अनुकरणीय गोष्टी, संस्कृतीचे देवाणघेवाण या अनुषंगाने ‘मिलन’ नौदल सरावाचे आयोजन करण्यात येते. या सरावाच्या पार्श्‍वभूमिवर अमेरिका, फ्रांस, श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया, म्यानमार, दक्षिण कोरिआसह विविध देशांनी यात सहभाग घेतला आहे. या देशांच्या नौदलांचे जहाज शुक्रवारी (ता. २५) विशाखापट्टणम येथे दाखल झाले आहेत. अशी माहिती नौदलाच्या पूर्व विभागाच्या मुख्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कॅप्टन सी.जी.राजू यांनी दिली.

भारतीय नौदलाच्या ‘मिलन-२०२२
Pune Corporation: भाजपचा धमाका; अडीच हजार कोटीची कामे मंजूर

मिलन सरावात या आधी दक्षिण पूर्व देशांच्या सहभाग असल्याने हा सरावाचे आयोजन अंदमान निकोबार येथील पोर्ट ब्लेअर येथे करण्यात येत होते. मात्र हळू-हळू इतर देशांच्या नौदलांचा सहभाग यात वाढत गेला. त्यामुळे सुविधांच्या अनुषंगाने विशाखापट्टणम येथे हा सराव होत आहे. मिलन-२०२२ च्या माध्यमातून तरुण अधिकाऱ्यांना विविध कौशल्ये शिकणे व आत्मसात करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. यामध्ये युद्धनौकेवरील संपूर्ण कौशल्य-संच, जबाबदाऱ्या आणि अधिकार, देखभाल करणारे अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर अपघातामुळे खोल समुद्रात पाणबुड्यांना वाचविण्यासाठी बचाव जहाजांची भूमिका कशी असावी याचे प्रत्यक्ष अभ्यास सरावात केला जाणार आहे. अशा प्रकारची क्षमता काही देशांकडे असून याचा फायदा भारताला देखील होऊ शकतो.

अमेरिकेने पहिल्यांदा घेतला सहभाग

‘मिलन’ या बहुराष्ट्रीय नौदल सरावाचे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते. तर या सरावाची सुरवात १९९५ मध्ये झाली होती. याच्या पहिल्या वर्षी भारतासह इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर आणि श्रीलंका या पाच देशांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर अनेक देशांचा सहभाग वाढत गेला. तर यंदा अमेरिका या देशाने देखील प्रथमच या सरावात सहभाग नोंदविला आहे. या सरावात अमेरिकेचे एक जहाज आणि पी८-ए विमान दाखल झाले आहे.

रशियाचा सहभाग नाही

सध्या युक्रेन आणि रशिया या देशांमध्ये वाद चिघळला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून या देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मिलन या सारावात इतर मित्र देशांप्रमाणे रशियाला देखील निमंत्रण देण्यात आले होते. परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे या सरावात रशियाने सहभाग घेतला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com