लाखेवाडीमध्ये 'सकाळ रिलिफ फंडा'तून ओढा खोलीकरणाच्या कामास सुरवात

राजकुमार थोरात
बुधवार, 16 मे 2018

वालचंदनगर : लाखेवाडी (ता.इंदापूर) येथे 'सकाळ रिलिफ फंडा'च्या माध्यमातून ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची  माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली.

येथील गावच्या पश्‍चिमेकडील भागातून ओढा वाहत आहे. ओढ्यामध्ये झाडे-झुडपे व मातीचा गाळ साचल्याने ओढ्याचे पात्र अरुंद झाले होते. तसेच ओढाच कायमस्वरुपी बुजण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामपंचायतीने 'सकाळ माध्यम समूहा'कडे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी केली होती. 

या कामाचा शुभारंभ आज बुधवार (ता.१६) रोजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने डिझेलच्या खर्चासाठी दाेन लाखांचा निधी दिला आहे. पुण्यातील उद्योजक विनायक वाळेकर यांनी माेफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिली आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, सरपंच सोमनाथ गायकवाड, उपसरपंच वामन थोरवे, वामन निंबाळकर, बबन खाडे, महेश निंबाळकर, दादा खराडे, जगन्नाथ चव्हाण, सतिश कदम, सदाशिव बागल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'सकाळ'चे बारामती विभागाचे जाहिरात प्रतिनिधी संजय घोरपडे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष पानसरे यांनी केले.   

'सकाळ माध्यम समूहा'ची विधायक कामे करण्याची परंपरा : हर्षवर्धन पाटील

यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, समाजाच्या उपयोगाची कामे करण्याची 'सकाळ माध्यम समूहा'ची अनेक वर्षांची परंपरा आहे. 'सकाळ'ने गेल्या चार-पाच वर्षांपासून जलस्त्रोत बळकट करण्यासाठी गावोगावी जलसंधारणाची सुरु केलेली कामे कौतुकास्पद असून, यामुळे गावेच्या गावे पाणीदार होत असल्याचे सांगितले. 

Web Title: Beginning of the work of building a work from Sakal Relief Fund in Lakhvadi