टाकळी ढोकेश्वर
टाकळी ढोकेश्वर

सामाजिक उपक्रमात बेलकर नेहमी अग्रभागी : औटी

टाकळी ढोकेश्वर : मागील बारा वर्षे सामाजिक ऋणातून उतराई होण्याच्या कर्तव्य भावनेतून बेलकर उद्योग समूह सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतात विवाहाचा हा उपक्रम सर्वांनाच बचतीतून प्रगतीचा संदेश देत उत्कर्षाकडे नेणारा आहे. आताही येथे पाण्याची टाकी बांधुन दिल्याने येथील ग्रामस्थांची सोय झाली सामाजिक उपक्रमात उद्योजक बेलकर नेहमी अग्रभागी असतात असे मत आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले.

कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथे उद्योजक व बाजार समितीचे संचालक शिवाजी बेलकर यांनी स्वखर्चातुन पाच हजार लिटर क्षमता असणारी पाण्याची टाकी बांधुन दिली तिचे उद्गघाटन औटी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, सरपंच साहेबराव वाफारे, पंढरीनाथ उंडे, एकनाथ उंडे, शिवाजी आंधळे उपस्थित होते.
दाते यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत समाजातील इतर उद्योजकांनीही बेलकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे. मुंबईत राहुन गावाविषयी आस्था ठेवुन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com