आंबेगावातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र मिळेना...

niradhar yojana.jpg
niradhar yojana.jpg

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुका संजय गांधी निराधार समितीकडे नऊ महिन्यांपासून 190 लाभार्थ्यांचे अर्ज होते. या सर्व अर्जांना 28 ऑगस्टच्या बैठकीमध्ये मंजुरी दिल्याचे नायब तहसीलदार ए. बी. गवारी यांनी सांगितले. मात्र, 19 डिसेंबरनंतर बैठक झालेली नाही. अजूनही लाभार्थ्यांना मंजुरी पत्र मिळाली नाहीत. तहसील कार्यालयाकडूनही या लाभार्थ्यांना वेळेत मानधन मिळत नाही. नवीन सरकार आल्यामुळे ही समिती बरखास्त झाली असून त्वरित नवीन समिती स्थापन करावी, अशी मागणी या समितीचे माजी सदस्य गोविंद काळे यांनी केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गिरवली येथील नंदा मंगेश सैद यांनी दहा महिन्यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज दिला होता. त्यांना अजूनही याबाबत मंजुरी बाबतचे पत्र मिळालेले नाही. संजय गांधी निराधार समितीकडे संजय गांधी योजनेचे लाभार्थी, इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी अर्ज करतात.

या समितीने मंजुरी दिल्यानंतर त्यांना हे 600 रुपये अनुदान प्राप्त होते. याबाबत गोविंद काळे म्हणाले, समितीची 19 डिसेंबर 2019 रोजी बैठक झाली होती. त्यानंतर आजपर्यंत ही बैठक न झाल्याने 190 जणांचे अर्ज पडून आहेत. तसेच कोरोनाचे कारण सांगून तलाठी, ग्रामसेवक यांचे दाखले न मिळाल्याने तालुक्‍यात अंदाजे 300 ते 400 अर्ज दाखल होऊ शकले नाहीत. 

 

तहसील कार्यालयात रोजंदारी कर्मचारी नेमले आहेत. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. लाभार्थ्यांना वेळेत मानधन मिळावे, वेळेत दाखले मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 
- गोविंद काळे, माजी सदस्य, आंबेगाव तालुका संजय गांधी निराधार समिती 
 

28 ऑगस्टच्या बैठकीमध्ये सर्व अर्ज मंजूर झाले असून लवकरच पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. 
- ए. बी. गवारी, नायब तहसीलदार 
 

 

जुलै 2020चे मानधन जमा करण्यासाठी दिले आहे. तर लाभार्थी निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे. मागणी केलेल्या सर्वच अर्जांचा निपटारा करण्यासंदर्भात सूचना केली आहेत. 
- रमा जोशी, तहसीलदार, ता. आंबेगाव  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com