जुन्नर: निराधार योजनेचे लाभार्थी अनुदानापासून वंचित

दत्ता म्हसकर
बुधवार, 16 मे 2018

जुन्नर - संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मागील चार महिन्यापासून अनुदान मिळाले नाही. आज मंगळवार ता. १५ रोजी जुन्नर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भारती मस्करे व कमिटीच्या वतीने नायब तहसीलदार आशा दुधे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

तसेच स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक मशीन बसविली आहेत. परंतु, लाभार्थ्यांचे ठसे उमटत नसल्यामुळे जनतेला स्वस्त धान्य मिळण्यास अडचणी येत आहेत. एकच आधारकार्ड सुविधा केंद्र असल्याने जनतेचे हाल होत आहेत. या प्रश्नाबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी आशा दुधे यांनी येत्या चार-पाच दिवसात संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील असे सांगितले. शिष्टमंडळात जुन्नर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रिजवान पटेल, कार्याध्यक्ष सौरभ बुट्टे पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष मझहर तिरंदाज, सरचिटणीस नईम मणियार, शरीफ ईनामदार तसेच महिला कार्यकर्त्यांचा सहभाग होता. 

Web Title: The beneficiary of the unfounded scheme is deprived of grants