महाराष्ट्रातील 'इतके' बंगाली मजूर परतले पश्चिम बंगालला

महाराष्ट्रातील 'इतके' बंगाली मजूर परतले पश्चिम बंगालला

पुणे : राज्यात सर्वाधिक बंगाली मजूर मुंबई, ठाणे आणि पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल 42 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांतून 9 जिल्ह्यातील सुमारे 72 हजार मजूर सोमवारपर्यंत राज्यातून रवाना झाले आहेत.

मुंबईतून 25, ठाण्यातून 7 आणि पुण्यातून 5 गाड्या बंगाली मजुरांसाठी रवाना झाल्या आहेत. नागपूरमधून 2 तर, कोल्हापूर, नांदेड, रत्नागिरी, येथून प्रत्येकी एक गाडी रवाना झाली आहे. या गाड्यांनी जळगाव आणि नगरमधील बंगाली मजुरांनाही पिकअप केले आहे, अशी माहिती पश्चिम बंगालमधील प्रिन्सिपल सेक्रेटरी संजय थाडे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे महाराष्ट्रात अडकलेल्या बंगाली मजुरांना पुन्हा बंगालमध्ये आणण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी 42 श्रमिक स्पेशल सोडण्याचे नियोजन केले होते, ते आता पूर्ण झाले आहे, तसेच बसद्वारेही सुमारे 20 मजूर आत्तापर्यंत महाराष्ट्रातून पश्चिम बंगालमध्ये आल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्यातूनही 4 श्रमिक स्पेशल पश्चिम बंगालमध्ये गेल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशाच्या वेगवेगळ्या राज्यात बंगाली मजूर, कामगार अडकले असले तरी त्यांच्या सर्वाधिक संख्या महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये आहे. सोन्याचे दागिने घडविणाऱया कारागीरांची मोठी संख्या हे पश्चिम बंगालचे वैशिष्ट आहे. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या या राज्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे येथील मजूर, कामगार वर्ग देशभर पोचला असून त्या-त्या शहरांतील अर्थव्यवस्थेला गती देण्याची भूमिका पार पाडत आहे. मिल कामगार, प्लंबर, बांधकाम मजूर, गवंडी आदींचाही त्यात समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रातून परणाऱ्या प्रत्येक मजूर, कारागीराचा स्वॅब घेऊन त्याची तपासणी करण्याची व्यवस्था पश्चिम बंगाल सरकारने प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी केली आहे. परतणाऱ्या मजुरांना रेल्वेतून त्या-त्या जिल्ह्याच्या ठिकाणी उतरविले जाते आणि तेथे त्यांची तपासणी होते. महाराष्ट्रातून रवाना होणाऱ्या या मजुरांना तीन लिटर पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थ दिले जातात आणि तेथे उतरल्यावर पश्चिम बंगाल सरकारही त्यांची गावापर्यत पोचेपर्यंत पुरेशी काळजी घेते, अशी माहिती थाडे यांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com