शास्त्रीय संगीताला पोषक वातावरण महाराष्ट्रातच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - ‘‘महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताला जेवढे पोषक वातावरण आहे तेवढे अन्यत्र कोठेही नाही. येथे संगीतासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांमुळे कानसेन तयार झाले,’’ असे प्रतिपादन नाट्यकर्मी डॉ. सतीश आळेकर यांनी ‘गानवर्धन’ संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी सांगितले. संस्थेने चाळीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल टिळक स्मारक मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

या कार्यक्रमात ऐंशी वर्षे वयाच्या ख्वाजाभाई कासम शेख यांना चर्मवाद्येनिर्मिती व दुरुस्तीतील कामगिरीबद्दल ‘वाद्य कलाकार पुरस्कारा’ने तर गायिका राधा हृदयनाथ मंगेशकर यांनाही कै. प्रतिभा परांजपे स्मृती संगीत प्रतिभा पुरस्कार गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यानंतर  मुग्धा वैशंपायनने आपल्या दमदार गायनाने मने जिंकून घेतली. नंतर पंडित रघुनंदन पणशीकर व पंडित आनंद भाटे यांनी परिपक्व गायकीने तृप्त केले. सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला), माउली टाकळकर (टाळ) यांची साथ होती. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले. चंद्रशेखर शेठ, विवेक सुरा, लता साठे, उद्धव भडसळकर व रवींद्र दुर्वे आदी उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. 

वासंती ब्रह्मे यांनी मानपत्रांचे वाचन व प्राची घोटकर यांनी सूत्रसंचालन केले.

चंद्र असाही उगवला 
‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे १९४८ चं बकुळ पंडित यांनी गायलेलं व आजही तेवढंच लोकप्रिय असलेलं नाट्यगीत मुग्धा वैशंपायन ही नव्या पिढीतील गायिका सादर करत होती. खुद्द बकुळताई श्रोत्यांमध्ये बसून तिला दाद देत होत्या. याला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत होता. 

Web Title: best atmosphere of classical music to Maharashtra