‘बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्‍टर’ लवकरच वाचकांच्या भेटीला...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

अधिक माहितीसाठी
 ऑनलाइन खरेदीसाठी www.sakalpublications.com किंवा amazon.in
 अधिक माहितीसाठी संपर्क ः सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे- ४११००२
 संपर्क ः ८८८८८४९०५० (कार्यालयीन वेळेत)

पुणे  -  ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या आजच प्रसिद्ध झालेल्या ७५०व्या अंकाच्या निमित्ताने ‘बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्‍टर’ हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशना’तर्फे वाचकांच्या भेटीस येत आहे.

वाचकांच्या भरभरून प्रतिक्रिया लाभलेल्या तसेच तज्ज्ञांनी नावाजलेल्या निवडक लेखांचा समावेश असलेल्या या पुस्तकाचे लेखन व संपादन ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले आहे. 

प्रातिनिधिक आजारांवरील उपचारांबरोबर प्रतिबंधात्मक उपचारांवर भर हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. मन, बुद्धी, प्राणशक्ती, पर्यावरण, प्रतिकारशक्ती, यकृत, मूत्रपिंड, हृदय आदी दहा प्रमुख विषयांशी संबंधित लेखांचे कौटुंबिक आरोग्य संवर्धनाची भूमिका पार पाडणारे हे पुस्तक आवर्जून संग्रही ठेवावे असे आहे. 

यासोबतच ‘स्वयंपाकघरातील दवाखाना’ आणि ‘श्रीमनप्रसन्न’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित होत आहेत. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमधील औषधी गुणांचे महत्त्व ‘स्वयंपाकघरातील दवाखाना’ उलगडून सांगते, तर ‘श्रीमनप्रसन्न’ पुस्तकात निरामय मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. या पुस्तकांचे लेखन व संपादनही ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले आहे.

‘बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्‍टर’चे मूल्य ६५० रुपये असून, ‘सकाळ’चे पुण्यातील मुख्य कार्यालय, राज्यातील सर्व आवृत्ती कार्यालये आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.

Web Title: Best of Family Doctor will soon be meeting readers