पुण्यात बेस्ट ऑम्लेट खायचंय? ही आहेत 5 ठिकाणं

नेहा मुळे 
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पुण्यात बेस्ट ऑम्लेट खायचंय? मग हे वाचाच... 

वीकएंड हॉटेल : ऑम्लेट

श्रावण, गौरी-गणपती सोबतच आता नवरात्रही संपले आहेत. अनेकांनी या दिवसांमध्ये असलेल्या श्रद्धेमुळे नॉन-व्हेज खाण्यावर नियंत्रण ठेवलेले असते. दिवाळीलाही अजून काही दिवस बाकी आहेत. गोड फराळ करायच्या आधी आपण थोडासा नॉन-व्हेजवर नक्कीच ताव मारू शकतो. आज अगदी हार्डकोर नॉन-व्हेजबद्दल बोलत नाही. यामध्ये आपण अंड्यापासून सुरवात करू शकतो. अंडे म्हटले की, सर्वांत पॉप्युलर डिश म्हणजे ऑम्लेट! ऑम्लेट ही एक परफेक्ट ब्रेकफास्ट डिश आहे. बनवायला एकदम सोपी आणि सर्वांना आवडणारी अशी ही डिश, पण आता या ऑम्लेटचेही अनेक प्रकार आहेत. आज पाहूयात पुण्यामध्ये कुठे-कुठे चांगल्या ऑम्लेटची चव चाखता येते. तशी मस्त ऑम्लेट मिळणारी ठिकाणे खूप आहेत. त्यापैकी काही निवडक ठिकाणे खाली नमूद केली आहेत.

वोहुमान कॅफे (रुबी हॉल क्लिनिकजवळ) : येथील बन मस्का आणि चहा प्रसिद्ध आहेच, पण त्याहून जास्त प्रसिद्ध आहे चीज ऑम्लेट! रोज इथे शहराच्या कानाकोपऱ्यातून चाहते चीज ऑम्लेट खायला येतात. ऑम्लेटमध्ये अक्षरशः चीजचे मोठे मोठे तुकडे घातलेले असतात आणि त्याने ऑम्लेटची चव अधिकच वाढते. एवढे चीज म्हटल्यावर अर्थातच हे ऑम्लेट अत्यंत पोटभरीचे ठरते. 

omlet

योकशायर (अनेक शाखा) : वेगवेगळे अंड्याचे प्रकार मिळणारी हे रेस्टॉरंट आहे. इथे ऑम्लेटचे अनेक प्रकार चाखायला मिळतात. त्यापैकी चीजी श्रुम, फार्महाउस फीस्ट आणि अमेरिकन ड्रीम हे ऑम्लेटचे प्रकार नक्की टेस्ट करायला हवेत. विशेष म्हणजे, या ऑम्लेटसोबत २ साईड डिशची निवड ही तुम्ही करू शकता. जसे की, हॅश ब्राऊन, बेक्ड बीन्स, फ्रेंच फ्राईज इत्यादी. 

omlet

राजू ऑम्लेट (सिंहगड रोड आणि विमाननगर) : बडोद्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या राजू ऑम्लेटच्या शाखा पुण्यातही सुरू झालेल्या आहेत. बटरचा अक्षरशः मारा असलेले ऑमेल्ट्स इथे मिळतात. बटर क्रश ऑम्लेट आणि बटर ग्रीन चीज ऑम्लेटची चव घेण्यासारखी आहे. हे पोटभरीचे आहे, हे वेगळे सांगायला नको. 

Image result for raju omlet pune

द इराणी कॅफे (अनेक शाखा) : नावाप्रमाणेच परफेक्ट इराणी व्हाईब असलेल्या या कॅफेत अर्थातच अंड्याचे अनेक प्रकार मिळतात. येथील मसाला चीज टोस्ट ऑम्लेट, चिकन चीज ऑम्लेट खास आहेत. 

व्हेर एल्स कॅफे (विमाननगर) : दररोज ब्रेकफास्ट मिळणाऱ्या या जागेत अनेक अंड्याच्या डिशेस मिळतात. इथे बेकन ऑम्लेट, मेडिटेरेनिअन ऑम्लेट आणि स्पॅनिश ऑम्लेटची चव चाखण्याजोगी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best places for omlet in Pune