राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरचा रोहन आदमाने सर्वोत्कृष्ट वक्ता 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

जुन्नर - जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरचा रोहन आदमाने याने सर्वोत्कृष्ट वक्ता 2018 ठरला. तर खुल्या गटात बारामतीचा प्रवीण शिंदे याने प्रथम क्रमांकाचा चषक मिळविला असल्याची माहिती मुख्य संयोजक मधुकर काजळे यांनी दिली. 

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या स्पर्धा घेण्यात येतात. यावर्षी पाच गटासाठी झालेल्या स्पर्धेत 467 स्पर्धक सहभागी झाले होते. खुल्या गटासाठी पुणे, नगर, मुंबई, परभणी, औरंगाबाद, कऱ्हाड, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील सुमारे 65 स्पर्धक सहभागी झाले होते. उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटील,नगर वाचनालायचे अध्यक्ष ललित गुजराथी,स्वराज्य मित्र मंडळाचे गोविंद हिंगे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन झाले.पारितोषिक वितरण आमदार शरद सोनावणे, तात्यासाहेब गुंजाळ, देवेंद्र खिलारी, शरद चौधरी यांच्या उपस्थितीत झाले. प्रास्तविक मधुकर काजळे यांनी केले. आभार शरद गुरव यांनी मानले. सूत्रसंचलन आकारं कवडे यांनी केले. 

स्पर्धेतील गट निहाय प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे :- 
खुला गट - द्वितीय मिथुन माने, नगर, तृतीय ऐश्वर्या पुरी, पुणे. गट इयत्ता 8 वी ते 10 वी:- यश लोणकर, गौरी थोरात, हर्षदा हांडे. गट इयत्ता 5 वी ते 7 वी :समृद्धी जगताप, वेदांत चिखले, शर्वरी बोऱ्हाडे. गट इयत्ता 3 री ते चौथी : शंतून धावडे, स्वरा पटाडे, तनिष्का मांजरे. गट नर्सरी ते 2 री : अनिल माही, ऋचा उंडे, सिद्धता बोऱ्हाडे.

Web Title: Best speaker in Kolhapur's Rohan Vidya in state level oratory