'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान मार्गदर्शन शिबिर

Beti Bachao Beti Padhao Campaign Guidance Camp in Loni Kalbhor
Beti Bachao Beti Padhao Campaign Guidance Camp in Loni Kalbhor

लोणी काळभोर - देशाच्या प्रगतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचे योगदान आहे. त्यामुळे देशाला महासत्ता बनविण्यासाठी तरुणांना पाठबळ देण्याबरोबरच समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता रुजविणे देखील जरुरीचे बनले आहे, असे मत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. कांता नलावडे यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे व्यक्त केले.
         
कदमवाकवस्ती ग्रापंचयातीच्या सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवड यांच्या वतीने शनिवारी (ता. 28) येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय येथे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कांता नलावडे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी वरील मत मांडले. यावेळी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानाच्या जिल्हा संयोजिका सुवर्णा जोशी, सहसंयोजिका संगिता जगताप, भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी सरचिटणीस पुनम चौधरी, ज्ञानप्रबोधिनी संवादिनी गटाच्या अंजली राईलकर, महालक्ष्मी पांडे, धनश्री म्हस्के, ग्रामपंचायत सदस्या माधुरी काळभोर, मंदाकिनी नामुगडे, सुषमा कांबळे, राणी बडदे, चित्तरंजन गायकवाड उपस्थित होते.
       
यावेळी कांता नलावडे म्हणाल्या, "देशातील महिलांमध्ये आत्मविश्वास व कौशल्यविकास वाढावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. देशाच्या जडणघडणीमध्ये स्त्रियांचे योगदान वाढावे व स्त्रियांच्या व्यक्तीमहत्त्व विकासाला चालना देणे गरजेचे बनले आहे. तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी त्यांना स्वयंराक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे."
       
यावेळी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने मुलींना 'हेल्थ किट'चे वाटप करण्यात आले. सर्व उपस्थितांचे आभार गौरी गायकवाड यांनी मानले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com