पुण्यातील तरुणांचा देशभर 'बेटी बचाओ...'चा जागर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

पुणे - "बेटी बचाओ बेटी पढाओ' हा संदेश देशभर पोचविण्यासाठी पुण्यातील तरुणांनी "पुणे ते भूतान' मोहीम सुरू केली आहे. जनजागृतीचे फलक लावलेल्या मोटारीतून 12 दिवसांचा प्रवास करत एक कोटी लोकांपर्यंत हा संदेश पोचविण्याचे उद्दिष्ट या तरुणांनी ठेवले आहे.

उद्योजक भाग्येश गजभार व बहुराष्ट्रीय कंपनीतील श्रीपाद कदम यांनी ही मोहीम आखली असून, याला केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री मनेका गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. या मोहिमेसंदर्भात अधिकाधिक जागृती व्हावी, यासाठी मंत्रालयातर्फे प्रवासामध्ये येणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

गजभार म्हणाले, ""मला मुलगी झाल्यानंतर प्रत्येक दिवस सणासुदीसारखा वाटू लागला. तेव्हाच स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी मोहीम आखण्याचा विचार केला. यासाठी रिओ ऑलिंपिकमध्ये यश मिळविलेल्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक व दीपा कर्माकर यांची प्रेरणा मिळाली. स्त्रियांवरील अत्याचार व त्यांच्याविषयीचा दुजाभाव दूर व्हावा, यासाठीही आम्ही जनजागृती करणार आहोत.''

मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या मोटारीवर "बेटी बचाओ बेटी पढाओ', "लेट मी एंटर धिस वर्ल्ड', "बेटी घरकी दीपा है, सिंधू है, साक्षी है' यांसारखी घोषवाक्‍य लावण्यात आली आहेत. पुणे, नागपूर, वाराणसी, सिलिगुडी, थिम्पूमार्गे सहा हजार किलोमीटरचा हा प्रवास होणार असून, 8 नोव्हेंबरला याची सांगता होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Beti Bachao..' publicity in Pune