फर्ग्युसन महाविद्यालयात गोंधळ, वाचा नेमके काय झाले (व्हिडिओ)

Pune
Pune

पुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळातच त्यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवाजागर व्याख्यानमाले अंतर्गत बी. जी. कोळसे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार आज दुपारी 12 ते 3 या वेळेत भारतीय संविधान या विषयावर महाविद्यालयातील अॅम्फी थिएटरमध्ये व्याख्यान ठेवले होते. पण, ऐनवेळी प्रशासनाने व्याख्यानाला परवानगी नाकारली. त्यामुळे महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला. अखेर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात व्याख्यान झाले. 

बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, की संविधानाच्या विषयावर बोलण्यासाठी आले असताना कार्यक्रम रद्द झाल्याचे कळाले. येथील गोंधळ पाहिल्यावर आश्चर्य वाटले. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात मला बोलायची परवानगी नाही. टिळकांची अभिवादन करून मी भारतीय संविधानावर बोलण्यासाठी आलो होते. दबंगशाही करून चालणार नाही, वैचारिक उत्तर द्यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकावर मी बोलणार आहे. बाबासाहेबांनी मुलभूत हक्कांबाबत लिहिले आहे. गरिब आणि श्रीमंतांमध्ये दरी नाही पाहिजे. आपले सगळे कर्तृत्व, दातृत्व जातीत सुरु होते आणि जातीतच संपते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com