भादलवाडी येथे रविवारपासुन यात्रा

प्रशांत चवरे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

भिगवण - भादलवाडी(ता.इंदापुर) येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा रविवार(ता.२५) पासुन सुरु होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त गावांमध्ये धामिर्क व प्रबोधनपर कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती यात्रा कमिटीचे प्रमुख दत्तात्रय कन्हेरकर व सरपंच राणीताई कन्हेरकर यांनी दिली आहे.

यात्रेनिमित्त रविवारी(ता.15) सकाळी महाअभिषेक, संध्याकाळी भैरवनाथांचे आंबील व शेरणी प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. रात्री नऊ वाजता छबिना(देवाची पालखीमधुन सवाद्य मिरवणुक) काढण्यात येणार आहेत. छबिना परत आल्यानंतर शोभेच्या दारुची आतषबाजी  करण्यात येईल. त्यानंतर आशाताई तरडगावकर व उषाताई सांगवीकर यांचा प्रबोधनाचा कायर्क्रम आयोजित करण्यात आला आहे. 

सोमवारी(ता.16) सकाळी दहा वाजता हजेरी कायर्क्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता परिसरातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी निकाली कुस्त्याच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

Web Title: Bhadalwadi bhairavnath yatra